“सुशांतबरोबर खूप वाईट घडलं”, उषा नाडकर्णी भावुक, म्हणाल्या, “कितीही पैसे दाबले तरी त्यांना...”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:07 PM2023-09-14T13:07:49+5:302023-09-14T13:10:39+5:30

'पवित्रा रिश्ता'ची आठवण सांगताना सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत उषा नाडकर्णी भावुक झाल्या होत्या.

usha nadkarni gets emotional shared sushant singh rajput pavitra rishta memory said they will punish by god | “सुशांतबरोबर खूप वाईट घडलं”, उषा नाडकर्णी भावुक, म्हणाल्या, “कितीही पैसे दाबले तरी त्यांना...”

“सुशांतबरोबर खूप वाईट घडलं”, उषा नाडकर्णी भावुक, म्हणाल्या, “कितीही पैसे दाबले तरी त्यांना...”

googlenewsNext

उषा नाडकर्णी या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. ‘माहेरची साडी’ असो अथवा ‘पवित्रा रिश्ता’ त्यांनी साकारलेली खट्याळ सासूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. चित्रपटातील ही खडूस सासू मात्र कलाविश्वातील कलाकारांची आऊ आहे. नुकताच उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने ‘लोकमत फिल्मी’च्या टीमकडून त्यांना खास सरप्राइज देण्यात आलं. वाढदिवसानिमित्त लाडक्या आऊंनी ‘लोकमत फिल्मी’शी गप्पा मारल्या.

उषा नाडकर्णींनी यावेळी ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवरील त्यांच्या वाढदिवसाची आठवण सांगितली. 'पवित्रा रिश्ता'ची आठवण सांगताना सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत त्या भावुक झाल्या होत्या. “पवित्र रिश्ताच्या वेळी उद्या माझा वाढदिवस आहे, हे कोणाला तरी कळलं. तेव्हा त्यांनी मला रात्री थांबवून ठेवलं. केक आणून त्यांनी रात्री तो कापला. त्यानंतर मालिका संपली तेव्हा गणपतीत केक आणून माझा वाढदिवस साजरा केला होता. मालिकेच्या नावाप्रमाणेच आमच्यातही एक पवित्र रिश्ता होता. आम्ही साडेपाच वर्ष कुटुंबीयांसारखे एकत्र होतो.”

"अजित पवार की देवेंद्र फडणवीस? प्रभावी उपमुख्यमंत्री कोण?" सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

पुढे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक होत त्या म्हणाल्या, “सुशांत गेला म्हणून खूप वाईट वाटतं. त्याचं खूप छान सुरू होतं. त्याच्याबरोबर खूप वाईट घडलं. असं व्हायला नको होतं. काही नालायक लोक आपल्याला आयुष्यात भेटतात. पण, ज्याने कोणी त्याचं वाईट केलं त्यांना देव शिक्षा देणारच. मी बघायला असेन किंवा नसेन...तुम्ही कितीही पैसे दाबा पण, देवाचे डोळे बंद नसतात. मला अनेकदा असा अनुभव आला आहे. आपण बोलायचं नसतं, पण देव त्यांना बरोबर शिक्षा देतो.”

Video: ...अन् रेखा यांनी पापाराझीच्या गालावर मारली चापट; पुढे काय घडलं पाहा

उषा नाडकर्णी आणि सुशांत सिंह राजपुतने ‘पवित्र रिश्ता’मध्ये एकत्र काम केलं होतं. या मालिकेतूनच सुशांतला खरी ओळख मिळाली होती. सुशांतने ‘पवित्र रिश्ता’मध्ये मानवची भूमिका साकारली होती. तर उषा नाडकर्णी या सुशांतच्या आईच्या भूमिकेत होत्या.

Web Title: usha nadkarni gets emotional shared sushant singh rajput pavitra rishta memory said they will punish by god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.