दोन बहिणी एकाच मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 14:49 IST2016-06-27T09:19:17+5:302016-06-27T14:49:46+5:30

वारीस या मालिकेतील सानिया तौकिरच्या अभिनयाचे सगळेच कौतुक करत आहेत. या मालिकेत ती साकारत असलेली मनूची भूमिका प्रेक्षकांना खूप ...

Two sisters in a single series | दोन बहिणी एकाच मालिकेत

दोन बहिणी एकाच मालिकेत

रीस या मालिकेतील सानिया तौकिरच्या अभिनयाचे सगळेच कौतुक करत आहेत. या मालिकेत ती साकारत असलेली मनूची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सानियाचे कौतुक होत असल्याने तर ती सध्या खूप खूश आहे पण त्याचसोबत ती सध्या आणखी एका कारणाने खूपच आनंदित आहे. सानियाची बहिण सुम्बुलही आता या मालिकेत झळकणार आहे. सानिया मालिकेत काम करत असल्याने तिचा सगळा वेळ शाळेत आणि चित्रीकरणात जातो. यामुळे तिला तिच्या बहिणीसोबत खेळायला, मस्ती करायला वेळच मिळत नव्हता. पण आता सानियाची बहीण मालिकेत काम करत असल्याने त्या दोघी चित्रीकरणाच्या दरम्यान सतत एकत्र असतात. बहिणीसोबत खूप सारा वेळ घालवायला मिळत असल्याने तसेच चित्रीकरणादरम्यान तिच्यासोबत खेळायला मिळत असल्याने सानिया सध्या चित्रीकरण करणे अधिक एन्जॉय करत असल्याचे ती सांगते.  

Web Title: Two sisters in a single series