टीना घई आठ वर्षांनंतर करतेय कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 17:12 IST2017-01-01T17:12:00+5:302017-01-01T17:12:00+5:30

तब्बल आठ वर्षांनंतर  ‘मे आय कम इन, मॅडम?’ या मालिकेद्वारे टीना घईने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. यात ती ...

Tina ghai eight years later, Comeback | टीना घई आठ वर्षांनंतर करतेय कमबॅक

टीना घई आठ वर्षांनंतर करतेय कमबॅक

्बल आठ वर्षांनंतर  ‘मे आय कम इन, मॅडम?’ या मालिकेद्वारे टीना घईने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. यात ती संजनाच्या आत्याची भूमिका साकारणार असून, छोट्या पडद्यावर कमबॅक करत असल्यामुळे ती खूप उत्सुक आहे. 

इतकी वर्षे ती आपल्या मुलीची काळजी घेण्यात बिझी होती. यासंदर्भात टीना म्हणाली, ‘आतापर्यंत मी माझ्या मुलीसाठी थोडा ब्रेक घेतला होता. तिच्याबरोबर मी खूपच छान दिवस घालविले. लहान मूल वाढत असताना त्याच्याकडे फार बारकाईने लक्ष द्यावे लागते, विशेषत: त्याच्या आईला. मला माझ्या लहान मुलीच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा होता. तिचं रांगणं, हसणं, रडणं आणि तिनं टाकलेलं पहिलं पाऊल यापैकी काहीही मला मिस करायायचं नव्हतं. आता ती मोठी झाली आहे, शाळेतही जायला लागलीय त्यामुळे मी माझ्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजेच अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला असल्याचे टीनाने सांगितले. 


Web Title: Tina ghai eight years later, Comeback