सूरज चव्हाण खरंच बाबा होणार? पत्नी संजनाच्या 'बेबी बंप' फोटोंमागचं सत्य आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:13 IST2026-04-19T13:12:37+5:302026-04-19T13:13:38+5:30
सूरज चव्हाणच्या पत्नीचे गरोदरपणातील व्हायरल फोटो खोटे की खरे?

सूरज चव्हाण खरंच बाबा होणार? पत्नी संजनाच्या 'बेबी बंप' फोटोंमागचं सत्य आलं समोर
suraj chavan wife sanjana pregnancy : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि सर्वांचा लाडका सूरज चव्हाण सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सूरजची पत्नी संजना हिचे गरोदरपणातील (Baby Bump) फोटो तुफान व्हायरल होत होते. सूरज लवकरच बाबा होणार अशा चर्चांनी जोर धरला होता. आता त्यामागचं सत्य समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संजनाचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते, ते पूर्णपणे फेक आणि AI (Artificial Intelligence) द्वारे एडिट केलेले होते.
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनचा ग्रँड फिनाले आज, १९ एप्रिल रोजी पार पडत आहे. या निमित्ताने फिनालेपूर्वी घरातील फायनलिस्टला भेटण्यासाठी 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण आपल्या पत्नीसह सेटवर पोहोचला होता. यावेळी सूरज आणि संजनाने अभिजीत सावंतसोबत एक फोटो काढला. या फोटोमध्ये संजना गरोदर नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. यावरून हे सिद्ध होतं की, तिचे व्हायरल झालेले 'बेबी बंप'चे फोटो हे खोटे होते.

दरम्यान, सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकला होता. सूरज-संजनाचा शाही विवाहसोहळा सासवड येथे पार पडला होता. संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. लग्नानंतर सूरज आपल्या पत्नीसह भन्नाट रील्स व्हिडीओ बनवताना दिसतो. तिच्यासोबतचे फोटोही तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.
'बिग बॉस ६' चा महाअंतिम सोहळा
'बिग बॉस मराठी ६'चा विजेता आज घोषित केला जाईल. यंदाचे टॉप-५ फायनलिस्ट तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. आज रात्री या पर्वाची ट्रॉफी कोण उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.