प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:10 IST2025-06-24T17:09:53+5:302025-06-24T17:10:25+5:30

मालिकेचा प्रोमो येतोय, त्याआधी पाहा ही झलक

subodh bhave and tejashri pradhan starrer new serial on zee marathi promo releasing soon | प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक

प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan)  लवकरच एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार अशी काही दिवसांपासून चर्चा होती. ही मालिका आहे की सिनेमा या गोंधळात चाहते सापडले होते. मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. तेजश्री आणि सुबोध भावे यांची जोडी नव्या मालिकेतून एकत्र येत आहे. झी मराठी वाहिनीवर ही मालिका येत आहे. मालिकेचा विषय नक्की काय असेल हेही गुपित समोर आलं आहे. सोशल मीडियावर काही तासात मालिकेचा प्रोमो येणार आहे. त्याआधी त्याची एक झलक पोस्ट करण्यात आली आहे.

सुबोध भावे नेहमीप्रमाणेच त्याच्या सूटबूट स्टाईलमध्ये दिसतोय. तर तेजश्री साध्या लूकमध्ये दिसतेय. या व्हिडिओत दोघांचाही चेहरा मात्र दाखवलेला नाही. तरी त्यांचे डायलॉग ऐकू येत आहेत. लग्नाच्या विषयावरच ही मालिका आधारित आहे.  दोघांचंही लग्नाचं वय उलटत चाललं आहे मात्र लग्न ठरतच नाहीये. लग्नाची इच्छा दोघांनाही आहे पण तसे जोडीदार त्यांना मिळत नाहीयेत. मालिकेचं नाव आणि प्रोमो हे आता काही तासातच कळणार आहे. रात्री ८.४० वाजता मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. 


सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमा काही महिन्यांपूर्वीच आला होता. दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. त्यांच्या जोडीला चाहत्यांची पसंतीही मिळाली. या सिनेमाचा विषयही असाच काहीसा होता. लग्नाचं वय उलटत असताना जोडीदार शोधता शोधता दोघं एकमेकांना भेटतात असा तो सिनेमा होता. आता मालिकेत यापेक्षा काय वेगळं असेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 

यानिमित्ताने तेजश्री प्रधान पुन्हा झी मराठीवर येत आहे. या वाहिनीवरील 'होणार सून मी या घरची' आणि 'अग्गंबाई सासूबाई' या तिच्या दोन्ही मालिका गाजल्या. त्यामुळे आता या नव्या मालिकेतून ती पुन्हा झी मराठीच्या प्रेक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. 

Web Title: subodh bhave and tejashri pradhan starrer new serial on zee marathi promo releasing soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.