"एक दिवस हिच्याबरोबर स्टेजवर...", मलायकाचा 'झी अवॉर्ड सोहळ्या'तील व्हिडिओ शेअर करत श्रेया बुगडेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 04:22 PM2023-10-31T16:22:35+5:302023-10-31T16:22:59+5:30

मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने झी मराठी अवॉर्ड सोहळ्यातील मलायकाचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

shreya bugde shared malaika arora zee marathi award 2023 video wrote special post | "एक दिवस हिच्याबरोबर स्टेजवर...", मलायकाचा 'झी अवॉर्ड सोहळ्या'तील व्हिडिओ शेअर करत श्रेया बुगडेची पोस्ट

"एक दिवस हिच्याबरोबर स्टेजवर...", मलायकाचा 'झी अवॉर्ड सोहळ्या'तील व्हिडिओ शेअर करत श्रेया बुगडेची पोस्ट

यंदाचा झी मराठी अवॉर्ड सोहळा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. झी मराठी अवॉर्ड २०२३मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावणार आहेत. फॅशन ब्युटी फिटनेस फ्रिक मलायका अरोराने यंदाच्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्याला चार चांद लावले. नुकतंच झी मराठी अवॉर्ड सोहळ्याचं शूटिंग पार पडलं. या सोहळ्यातील काही प्रोमो समोर आले आहेत. 

मलायकाने झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात डान्स करण्यापासून ते बेसनाचे लाडू बनवण्यापर्यंत सगळं काही करत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने झी मराठी अवॉर्ड सोहळ्यातील मलायकाचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत मलायका बेसनाचे लाडू बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत श्रेयाने मलायकाबाबत खास पोस्ट शेअर केली आहे. 

"शाळेत गॅदरिंगमध्ये हिचं 'chaiyya chaiyaa’ गाणं स्टेजवर परफॉर्म केलं होतं ...तेव्हा वाटलंही नव्हतं एक दिवस हिच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करेन...‘आयुष्य एक वर्तुळ आहे’ जे म्हणतात ते हेच असावं बुआ !!", असं श्रेयाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. झी मराठी अवॉर्ड सोहळा ४ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

Web Title: shreya bugde shared malaika arora zee marathi award 2023 video wrote special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.