नाद खुळा! अभिनेत्री ऋतुजाच्या फोटोवर भाळली, चक्क ऋतुजाला लग्नाची मागणीच घातली....!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 21:02 IST2021-09-28T21:00:03+5:302021-09-28T21:02:18+5:30

माझ्याशी लग्न करशील? ऋतुजाच्या फोटोवर भाळणारी कोण आहे ही अभिनेत्री?

rutuja bagwe share her saree photos on social media akshaya naik comment on it | नाद खुळा! अभिनेत्री ऋतुजाच्या फोटोवर भाळली, चक्क ऋतुजाला लग्नाची मागणीच घातली....!!

नाद खुळा! अभिनेत्री ऋतुजाच्या फोटोवर भाळली, चक्क ऋतुजाला लग्नाची मागणीच घातली....!!

ठळक मुद्देअक्षया नाईक सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत लतिकाची भूमिका साकरताना दिसत आहे.

नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियावरचे तिचे सुंदर फोटो पाहून चाहतेही प्रेमात पडतात. पण आता काय तर चक्क एक अभिनेत्रीच ऋतुजाच्या फोटोंवर भाळली आहे. नुसती भाळली नाही तर हा फोटो पाहून तिने चक्क ऋतुजाला लग्नाची मागणी घातलीये.
 ऋतुजाने नुकतेच तिचे खणाच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा नुसता पाऊस पडला. चॉकलेटी रंगाची खणाची साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज शिवाय सोबत एक अनोखा ट्विस्ट, अशा तिच्या फोटोला चाहत्यांची भरभरून पसंती मिळाली. पण मराठमोळी अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) ही ऋतुजाचे हे फोटो पाहून जणू तिच्या प्रेमातच पडली.

‘माझ्याशी लग्न करशील?’, असा थेट सवाल तिने केला. अक्षयाच्या या कमेंटची चर्चा झाली नसेल तर नवल. ऋतुजा यावर काय उत्तर देते, याची उत्सुकता होतीच. ऋतुजाने यावर एक डोळे झाकलेल्या माकडाची इमोजी, हार्ट आणि किसींग इमोजी पोस्ट केली.
 अक्षया नाईक सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत लतिकाची भूमिका साकरताना दिसत आहे. ऋतुजाबद्दल सांगायचे तर नांदा सौख्य भरे, तु माझा सांगाती, चंद्र आहे साक्षिला या मालिकांमधून ऋतुजा घराघरात पोहोचली. अलीकडे ‘चंद्र आहे साक्षिला’मध्ये ती अभिनेता सुबोध भावे सोबत दिसली होती. 

Web Title: rutuja bagwe share her saree photos on social media akshaya naik comment on it