रोहन मेहराचं अफेअर जगासमोर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 13:41 IST2016-10-18T13:41:43+5:302016-10-18T13:41:43+5:30
बिग बॉसच्या घरात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. घरातील स्पर्धकांची गुपितं, रहस्य, अफेअर यावरुन पडदा उठतो तो बिग बॉसच्या ...

रोहन मेहराचं अफेअर जगासमोर !
ब ग बॉसच्या घरात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. घरातील स्पर्धकांची गुपितं, रहस्य, अफेअर यावरुन पडदा उठतो तो बिग बॉसच्या घरातच. यंदाच्या दहाव्या सीझनमधील स्पर्धक रोहन मेहराची घरात एंट्री होताच त्याच्याविषयीचे गुपित जगासमोर आले आहे. इतके दिवस जगापासून लपवून ठेवलेले त्याचं अफेअर जगापुढे आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रोहन मेहरा आणि कांची सिंह यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांमध्ये नक्कीच काही तरी शिजत आहे असे बोलले जात होते. मात्र या निव्वळ चर्चा असल्याचे सांगत स्पष्ट बोलण्यास रोहनने नकार दिला होता. बिग बॉसच्या घरात एंट्री होताच रोहनने आपल्या या अफेअरचे गुपित उघड केले आहे. कांचीवर प्रेम होते असा खुलासा रोहनने बिग बॉसच्या घरात एंट्री होताच केला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात काहीही लपून राहत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.