राहुल वैद्य आणि दिशा परमारने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:26 PM2024-02-13T12:26:56+5:302024-02-13T12:29:26+5:30

राहुल व दिशा यांचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rahul Vaidya, Disha Parmar reveal daughter Navya's face for the first time WATCH video | राहुल वैद्य आणि दिशा परमारने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो पाहिलात का?

राहुल वैद्य आणि दिशा परमारने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो पाहिलात का?

गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार ही टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी आहे. इंडियन आयडॉलमधून राहूल घराघरांत पोहचला. तर दिशा विविध मालिकांमधून लोकप्रिय झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी २० सप्टेंबर २०२३ला दिशा परमारने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून या गोड बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. आता दिशा आणि राहुल यांनी लेकीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. 
 
दिशा आणि राहुलनं आपल्या लाडक्या लेकीला बराच काळ लाइमलाइटपासून दूर ठेवले होते. आता राहुल व दिशा यांचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघं सर्व पापाराझींना आपल्या मुलीची ओळख करून देताना दिसत आहे. दिशाने मुलीला आपल्या कडेवर घेतले आहे. दोघेही मुलींसोबत कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण राहुल व दिशा यांची मुलगी नव्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.एका चाहत्याने नव्या वडील राहुलसारखी दिसत असल्याचं म्हटलं. त्यानं लिहलं, 'खूपच गोड, खूपच छान, अगदी राहुलवर गेली आहे, नव्या अगदी आपल्या बांबांची कार्बन कॉपी आहे. तर इतर चाहत्यांनीही राहुल, दिशा आणि नव्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

दिशा आणि राहुलच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य करायचं झालं तर, त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात सोशल मीडियावर एका कमेंटने झाली होती. राहुलचा एक म्युझिक व्हिडीओ पाहून दिशा प्रभावित झाली आणि तिने कमेंट केली. दिशा परमारची ही कमेंट पाहून राहुल खूश झाला. पहिल्या म्युझिक अल्बमच्या शूटिंगनंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. २०२० मध्ये 'बिग बॉस १४' शोमध्ये राहुलने दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर दोघांनी १६ जुलै २०२१ रोजी लग्न केलं. मुंबईमध्ये अत्यंत शाही पद्धतीने राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा विवाहसोहळा पार पडला. या लव्हबर्ड्सनी १८ मे २०२३ रोजी सोशल मीडियावरून आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. 

Web Title: Rahul Vaidya, Disha Parmar reveal daughter Navya's face for the first time WATCH video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.