​पूजा लागली तयारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 16:22 IST2016-09-19T10:52:54+5:302016-09-19T16:22:54+5:30

नागार्जुन एक योद्धा या मालिकेतील पूजा बॅनर्जीचे 12 ऑक्टोबरला तिचा प्रियकर संदीप जैस्वालसोबत साखरपुडा होणार आहे. पूजाचे कुटुंबिय नागपूरमध्ये ...

Pooja starts preparing | ​पूजा लागली तयारीला

​पूजा लागली तयारीला

गार्जुन एक योद्धा या मालिकेतील पूजा बॅनर्जीचे 12 ऑक्टोबरला तिचा प्रियकर संदीप जैस्वालसोबत साखरपुडा होणार आहे. पूजाचे कुटुंबिय नागपूरमध्ये राहातं तर पूजा मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईला एकटी राहाते. त्यामुळे ती सध्या एकटीच तिच्या साखरपुड्यासाठी सगळी खरेदी करत आहे. आबिगाईल पांडेसोबत तिने तिच्या लहेंगाची खरेदीदेखील केली. त्याचसोबत सध्या तिने नृत्याचे क्लासेसदेखील लावले आहेत. कारण ती तिच्या साखरपुड्याच्या दिवशी खास संदीपसाठी एक नृत्य सादर करणार आहे. याविषयी पूजा सांगते, चित्रीकऱण लवकर संपले की मी शॉपिंगला जाते. माझी अजून खूप खरेदी बाकी आहे. साखरपुड्याची अंगठीदेखील मला घ्यायची आहे. तसेच मी न चुकता नृत्याच्या क्लासेसना हजेरी लावत आहे. मी माझ्या दोन आवडत्या गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. 

Web Title: Pooja starts preparing