खुलता कळी खुलेना फेम अभिज्ञा भावे झळकणार कट्टी बट्टी या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:54 IST2018-02-27T11:24:50+5:302018-02-27T16:54:50+5:30

खुलता कळी खुलेना या मालिकेतील मोनिका या व्यक्तीरेखेने रसिकांची मने जिंकली होती. ही भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने मोठ्या ...

Opening Kisal khulena fame will lead to the discovery, in the series Katti Bati | खुलता कळी खुलेना फेम अभिज्ञा भावे झळकणार कट्टी बट्टी या मालिकेत

खुलता कळी खुलेना फेम अभिज्ञा भावे झळकणार कट्टी बट्टी या मालिकेत

लता कळी खुलेना या मालिकेतील मोनिका या व्यक्तीरेखेने रसिकांची मने जिंकली होती. ही भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने मोठ्या खूबीने साकारली होती. या मालिकेत अभिज्ञाच्या वाट्याला आलेल्या मोनिका या भूमिकेला निगेटिव्ह शेड होती. अभिज्ञाने आपल्या नैसर्गिक आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी अभिज्ञा भावे ही छोट्या पडद्यापासून दूर होती. पण आता ती लवकरच एका मालिकेत काम करणार आहे. 
कट्टी बट्टी ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेतील अश्विनी कासार मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत अभिज्ञा देखील प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कट्टी बट्टी या मालिकेचे कथानक हे मराठवाड्याशी संबंधित असल्याने या मालिकेचे चित्रीकरण हे सध्या अहमदनगर येथेच सुरू आहे आणि या मालिकेचे कलाकार देखील याच परिसरातील आहेत. अश्विनी आणि अभिज्ञा यांसारखे प्रसिद्ध कलाकार असण्यासोबतच अनेक नवोदित कलाकार या मालिकेचा भाग आहेत. या मालिकेत अभिज्ञाची भूमिका तिच्या खुलता कळी खुलेना या मालिकेतील भूमिकांपेक्षा खूपच वेगळी असणार असल्याचे म्हटले जात आहे. 
मूळची मुंबईची असलेल्या मोनिकाने डी.जी. रुपारेल या महाविद्यालयातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात करियरला सुरुवात करण्याआधी अभिज्ञा एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिज्ञाने काही काळ एअर होस्टेस म्हणून काम केले होते. मात्र त्याच काळात श्रावण क्वीन 2010 या सौंदर्य स्पर्धेत फायनलिस्ट म्हणून तिची निवड झाली आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. यानंतर विविध टीव्ही मालिकांच्या ऑफर्स अभिज्ञाला मिळाल्या.'लगोरी' या मालिकेत तिने मुक्ता ही भूमिका साकारली. अस्मिता, एक मोहोर अबोल अशा मराठी मालिकांमध्येही तिने छोट्या भूमिका साकारल्या. याशिवाय हिंदी मालिकांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. लव्ह यू जिंदगी, प्यार की एक कहानी, धर्मकन्या, बडे अच्छे लगते है या मालिकांमध्येही तिने भूमिका साकारल्या. 'लंगर' हा मराठी सिनेमा आणि लग्नलॉजी या नाटकातही भूमिका साकारुन अभिज्ञाने रसिकांच्या मनात स्थान मिळवले. 

Also Read : खुलता कळी खुलेना फेम ओमप्रकाश शिंदे म्हणजेच विक्रांतची अशी झाली होती फजिती

Web Title: Opening Kisal khulena fame will lead to the discovery, in the series Katti Bati