ऋतुजाचा बोल्ड फोटो अन् 'हास्यजत्रा' फेम ओंकार राऊतने केलं फ्लर्ट, म्हणाला, 'तुझं माझं नेटवर्क..'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:00 AM2023-03-26T10:00:48+5:302023-03-26T10:02:46+5:30

ओंकारच्या फ्लर्टिंगवर ऋतुजाची मजेशीर प्रतिक्रिया

Omkar Raut maharashtrachi hasyajatra fame flirted with actress rutuja bagwe bold photo | ऋतुजाचा बोल्ड फोटो अन् 'हास्यजत्रा' फेम ओंकार राऊतने केलं फ्लर्ट, म्हणाला, 'तुझं माझं नेटवर्क..'

ऋतुजाचा बोल्ड फोटो अन् 'हास्यजत्रा' फेम ओंकार राऊतने केलं फ्लर्ट, म्हणाला, 'तुझं माझं नेटवर्क..'

googlenewsNext

अनन्या या नाटकातून लोकप्रियतेस आलेली मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) तिच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. ऋतुजा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. मालिका आणि नाटक अशा दोन्ही क्षेत्रात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ऋतुजाने नुकताच् इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या गाऊनमध्ये एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकार ओंकार राऊतने (Onkar Raut) लक्षवेधक कमेंट केली आहे. ऋतुजा आणि ओंकारचं कमेंट सेक्शनमधील हे संभाषण मजेशीर आहे.

अभिनेत्री ऋतुजा बागवेने नुकतेच एक फोटोशूट केले. लाल रंगाच्या स्वीव्हलेस आणि ओपन थाय गाऊमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. तसंच गळ्यात एक नाजुक नेकलेसही घातला होता. तिच्या या फोटोवर ओंकार राऊतने 'हे सेक्सी यू' अशी कमेंट केली. तर यावर ऋतुजाने 'हाहा थँक यू' अशी कमेंट केली. ऋतुजाची ही कमेंट चुकून दोन वेळी पोस्ट झाली. तर यावर ओंकारने तिची चेष्टा केली. तो म्हणाला, 'दोन वेळा थँक यू बोललीस त्याबदद्ल दोन वेळा वेलकम'. त्याच्या या कमेंटवर ऋतुजा म्हणाली, 'मग नेटवर्कलाही म्हण'.

ऋतुजाच्या या कमेंटनंतर ओंकारने थोडं फ्लर्ट केलं. तो म्हणाला, 'तुझं माझं नेटवर्क गं!!' यावर ऋतुजा म्हणाली, 'सर्व्हर डाऊन आहे.' तर ओंकार म्हणाला, 'असलेला सर्व्हरही बरी रेंज देतंय ग!!' यानंतर ऋतुजाने मात्र हार मानली आणि म्हणाली,'तु जिंकलंस'.

ओंकारने थेट सोशल मीडियावर खुलेआम ऋतुजाशी फ्लर्ट केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान ओंकारचा काही दिवसांपूर्वीच प्रियदर्शिनी इंदलकरसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये ओंकार प्रियदर्शिनीकडे अगदी प्रेमाने बघतानाचा असा तो फोटो आहे. यानंतर दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चांना उधाण आले होते.

Web Title: Omkar Raut maharashtrachi hasyajatra fame flirted with actress rutuja bagwe bold photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.