लग्नानंतर मुग्धाचं सासरी झालं जंगी स्वागत! उखाणा घेताना प्रथमेश म्हणाला- "माझी गरीब गाय बाकी सगळ्या..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:04 AM2023-12-30T11:04:43+5:302023-12-30T11:05:13+5:30

Mugdha Vaishampayan-Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत. दरम्यान मुग्धाने तिच्या सासरी गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांचे स्वागत, त्या दोघांनी घेतलेले उखाणे आणि धमालमस्ती पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Mugdha Vaishampayan's a warm welcome after marriage at Prathamesh Laghate's house! Video goes viral | लग्नानंतर मुग्धाचं सासरी झालं जंगी स्वागत! उखाणा घेताना प्रथमेश म्हणाला- "माझी गरीब गाय बाकी सगळ्या..."

लग्नानंतर मुग्धाचं सासरी झालं जंगी स्वागत! उखाणा घेताना प्रथमेश म्हणाला- "माझी गरीब गाय बाकी सगळ्या..."

सारेगमप लिटिल चॅम्प्समधून घराघरात लोकप्रिय झालेले मॉनिटर आणि मोदक म्हणजेच मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत. २१ डिसेंबरला त्या दोघांनी चिपळूणमध्ये लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाला जवळच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आता मुग्धाने तिच्या सासरी गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांचे स्वागत, त्या दोघांनी घेतलेले उखाणे आणि धमालमस्ती पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

मुग्धा वैशंपायन हिने इंस्टाग्रामवर गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, गृहप्रवेश! हा क्षण एक आठवड्या आधीचा!  शेवटपर्यंत पहा! आमचे उखाणे चुकवू नका! या व्हिडीओत पाहायला मिळतंय की, नव वधूच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट आणि फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. कोकणातील परंपरेनुसार मुग्धाचा लघाटेंच्या घरी गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी त्या दोघांनी खूप छान उखाणेदेखील घेतले.

गृहप्रवेशावेळी उखाणा घेताना प्रथमेश म्हणाला, कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी, मुग्धा माझी गरीब गाय बाकी सगळ्या मारक्या म्हशी. त्याचा उखाणा ऐकून सगळ्यांना हसू आवरलं नाही. तर मुग्धाने उखाणा घेताना म्हटले की, मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर अन् माहेरची खूण प्रथमेशचं नाव घेऊन कलाश्रीमध्ये प्रवेश करते नीना आणि उमेश लघाटे यांची सून! गृहप्रवेशाच्या व्हिडीओला आणि त्या दोघांनी घेतलेल्या उखाण्याला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

 

Web Title: Mugdha Vaishampayan's a warm welcome after marriage at Prathamesh Laghate's house! Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.