मृणाल पहिल्यांदाच कॉर्पोरेट लुकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 18:22 IST2016-10-19T18:22:11+5:302016-10-19T18:22:11+5:30

मृणाला दुसानीला आपण तिच्या मालिकांमध्ये ट्रेडिशनल लुकमध्ये बघितले आहे. मात्र आता पहिल्यांदाच ऑनस्क्रीन मृणाल काॅर्पारेट लुकमध्ये दिसणार आहे. 'अस्सं सासर ...

Mrinal is in the corporate look for the first time | मृणाल पहिल्यांदाच कॉर्पोरेट लुकमध्ये

मृणाल पहिल्यांदाच कॉर्पोरेट लुकमध्ये

णाला दुसानीला आपण तिच्या मालिकांमध्ये ट्रेडिशनल लुकमध्ये बघितले आहे. मात्र आता पहिल्यांदाच ऑनस्क्रीन मृणाल काॅर्पारेट लुकमध्ये दिसणार आहे. 'अस्सं सासर सुरेख बाई' मधील जुई म्हणजेच सगळ्यांची लाडकी मृणाल मालिकेमध्ये संसार आणि इनामदारांचा व्यवसाय अतिशय उत्तमरित्या सांभाळते आहे. ज्यामध्ये तीला यशचा, तिच्या घरच्यांचादेखील खंबीर पाठिंबा आहे. पृथ्वीराज म्हणजे जुईचे वडील मुंबईत होणाऱ्या बिझनेस कॉन्फरन्ससाठी पृथ्वी एंटरप्राइझ तर्फे विभाएवजी जुईची निवड करतात. जुई आणि महाजन कुटुंबाचा आनंद या बातमीने द्विगुणीत झाला आहे. यश जुईसाठी खूप खुश आहे. जुई या कॉनफरन्ससाठी जाते आणि तिथे ती वूमन ऑफ द इयर (बिजनेस) हे अॅवार्डही जिंकते. त्यामुळे या आनंदामध्ये आणखी भर पडते. या कॉनफरन्ससाठी जुईने कॉर्पोरेट लुक पहिल्यांदा मालिकेमध्ये वापरला आहे. प्रेक्षकांसाठी जुईचा हा कॉनफरन्ससाठी वापरलेला नवा लुक नक्कीच आवडेल.जुईला अचानक मिळालेले हे महत्व आणि अॅवार्ड विभाला अजिबात आवडत नाही. विभाचा जुईबद्दल असलेला द्वेष फक्त संसारपुरताच मर्यादित होता पण आता तो बिझनेस आणि कामामध्येदेखील आला आहे. त्यामुळे विभा आता जुईसाठी कुठले नवीन संकंट आणेल ? जुई याला कशी सामोरी जाईल ? महाजन आणि यश – जुईच्या आनंदाला गालबोट तर लागणार नाही ना? या सा-या गोष्टींचा उलगड येणा-या भागात होणार आहे. 

Web Title: Mrinal is in the corporate look for the first time