लग्नानंतर आणखी सुंदर दिसतेय मिताली मयेकर, गुलाबी साडीतल्या फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 12:57 IST2021-04-07T12:54:32+5:302021-04-07T12:57:18+5:30

सध्या मिताली झी मराठीवरील 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे.

Mithali mayekar looks beautiful in pink color saree | लग्नानंतर आणखी सुंदर दिसतेय मिताली मयेकर, गुलाबी साडीतल्या फोटोला मिळतेय पसंती

लग्नानंतर आणखी सुंदर दिसतेय मिताली मयेकर, गुलाबी साडीतल्या फोटोला मिळतेय पसंती


अभिनेत्री मिताली मयेकर हिने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसते. लग्नानंतर मिताली सिद्धार्थसोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी मात्र  मितालीने तिचा गुलाबी रंगाच्या साडीतला सुंदर फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. मितालीचा हा फोटो सिद्धार्थ चांदेकरने काढला आहे. लख लख सोनेरी असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे. लग्नानंतर मितालीचे सौंदर्य आणखीनच खुलून आलंय. फोटोतील मितालीचं स्मितहास्य कुणालाही घायाळ करेल असेच आहे. 

सध्या मिताली झी मराठीवरील 'लाडाची मी लेक गं'  या मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे. सिद्धार्थ आणि मितालीकडे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपल म्हणून पाहिलं जातं. यावर्षांच्या सुरुवातील जानेवारी महिन्यात मिताली आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकले.

 ​या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते.

Web Title: Mithali mayekar looks beautiful in pink color saree