‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनीलने खरेदी केली मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:13 PM2023-08-04T12:13:20+5:302023-08-04T12:27:37+5:30

मराठी अभिनेत्रीने खरेदी केली महागडी मर्सिडीज कार, किंमत जाणून घ्या

mazya navryachi baiko fame actress rasika sunil buys mercedes gla car shared video | ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनीलने खरेदी केली मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनीलने खरेदी केली मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

googlenewsNext

मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील शनायाच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेमुळे तिच्या चाहत्या वर्गातही भर पडली. त्यानंतर रसिका अनेक मालिका आणि चित्रपटांतही दिसली. रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नव्या प्रोजेक्टबद्दल पोस्ट शेअर करत ती चाहत्यांना माहिती देत असते. नुकतीच रसिकाने अशीच एक गुडन्यूड शेअर केली आहे.

रसिकाने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. महागड्या गाड्यांपैकी एक असलेली मर्सिडीज बेन्झ जीएलए ही गाडी रसिकाने खरेदी केली आहे. मर्सिडीजच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवरुन रसिकाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आली आहे. रसिका कुटुंबीयांसह गाडी खरेदी करण्यासाठी गेली होती. गाडी खरेदी करतानाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. रसिकाने खरेदी केलेल्या या मर्सिडीज बेन्झची किंमत तब्बल ४८ ते ५२ लाखांच्या घरात आहे.

“मी माझ्या आईसाठी अंतवस्त्र खरेदी करतो”, करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला...

रसिकाच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. अनेक कलाकारांनीही रसिकाचं अभिनंदन केलं आहे. रसिका काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या फकाट चित्रपटात दिसली होती. सध्या ती ‘डाएट लग्न’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Web Title: mazya navryachi baiko fame actress rasika sunil buys mercedes gla car shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.