आई अन् वडिलांपैकी दिपिकाने केली 'ही' निवड; कार्तिक-दिपा झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 17:07 IST2022-08-22T17:07:00+5:302022-08-22T17:07:25+5:30

Rang Maza Vegla: दिपिकाने घेतला महत्त्वाचा निर्णय

marathi tv serial Rang Maza Vegla Deepika will choose between Karthik and Deepa | आई अन् वडिलांपैकी दिपिकाने केली 'ही' निवड; कार्तिक-दिपा झाले भावुक

आई अन् वडिलांपैकी दिपिकाने केली 'ही' निवड; कार्तिक-दिपा झाले भावुक

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या मालिकेत सध्या ट्विस्ट अँड टर्न येत आहेत. दिपिका आपलीच लेक असल्याचं सत्य दिपाला समजलं आहे. त्यामुळे कायदेशीरित्या दिपिकाचा ताबा मिळावा यासाठी दिपाने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, दिपाकडे दिपिकाची कस्टडी जाऊ नये कार्तिक शक्य होतील तितके प्रयत्न करत आहे.  यामध्येच आता दिपिकालाही तिच्या आई-वडिलांचं सत्य समजलं असून ती कार्तिक आणि दिपापैकी एकाची निवड करणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये न्यायाधीश दिपिकाला तिला कोणासोबत राहायला आवडेल असं विचारतात. त्यांच्या या प्रश्नावर दिपिका कार्तिक आणि दिपापैकी एकाची निवड करते. परंतु, तिची निवड करताना तिने दिलेल्या उत्तरामुळे कार्तिक आणि दिपा दोघांचेही डोळे पाणावतात.

'तुला आई किंवा बाबा कोणासोबत राहायला आवडेल?' असा प्रश्न दिपिकाला विचारला जातो. त्यावर, ''आपले दोन्ही हात महत्त्वाचे असतात. त्यातला एकही हात नसेल तर प्रॉब्लेम होईल. तसंच माझे दोन हात म्हणजे माझे पालक आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाची मी कशी काय निवड करु? असा प्रतिप्रश्न ती विचारते''. तिच्या या उत्तरामुळे दिपा आणि कार्तिक दोघांचेही डोळे पाणावतात.

दरम्यान, दिपिकाने कार्तिक किंवा दिपापैकी एकाची निवड करणं तिच्यासाठी कठीण असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे निदान लेकीच्या प्रेमाखातर तरी ही जोडी आता एकत्र येईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: marathi tv serial Rang Maza Vegla Deepika will choose between Karthik and Deepa