“अपनेही रंग में…”; मुग्धाच्या हाती स्टेअरिंग अन् प्रथमेशचे सूर, रोमँटिक लाँग ड्राइव्ह डेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 04:27 PM2023-10-14T16:27:44+5:302023-10-14T16:30:19+5:30

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनचा सुरेल व्हिडिओ

marathi singers prathamesh laghate and mugdha vaishampayan romantic long drive date | “अपनेही रंग में…”; मुग्धाच्या हाती स्टेअरिंग अन् प्रथमेशचे सूर, रोमँटिक लाँग ड्राइव्ह डेट!

“अपनेही रंग में…”; मुग्धाच्या हाती स्टेअरिंग अन् प्रथमेशचे सूर, रोमँटिक लाँग ड्राइव्ह डेट!

क्युट मराठी कपल जे उत्तम गायक आहेत ते म्हणजे प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan). दोघंही सध्या त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प फेम सर्वांचे लाडके मॉनिटर आणि मोदक यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अगदी अनेक ठिकाणी दोघांचं केळवणही पार पडलं. या वर्षाअखेरीस दोघंही लग्नबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. नुकतंच त्यांचा कारमध्ये गाणं गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

प्रथमेश आणि मुग्धा सध्या त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमांसाठी टूर वर आहेत. दरम्यान मुग्धा अनेकदा कार चालवताना दिसली आहे. नुकतंच प्रथमेशने एक व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यामध्ये मुग्धा कार ड्राईव्ह करत आहे तर प्रथमेश बाजूच्या सीटवर बसलाय. हिंदीतील लोकप्रिय गाणं 'ओ रंगरेज मेरे...' गाताना दिसत आहेत. मस्त रोमँटिक मूड तयार झालेला दिसतोय. 'अपने ही रंग मे मुझको रंग दे...' म्हणत ते मस्त लाँग ड्राईव्ह एन्जॉय करत आहेत. मुग्धाच्या हाती स्टेअरिंग आहे तर प्रथमेशचे सुरेल सूर आहेत असा एकंदरच रोमँटिक माहोल तयार झाला आहे.

प्रथमेश आणि मुग्धा या जोडीचे येत्या दिवाळीत जोरदार कार्यक्रम रंगणार आहेत. दिवाळी पहाटमध्ये त्यांच्या सुरांची मैफिल सजणार आहे. त्यासाठी ते आतापासून तयारीलाही लागले आहेत. या सुंदर जोडीला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात. तसंच ड्रायव्हिंग करताना गाणं नको, गाडी थांबवून मग व्हिडिओ बनवा असा काळजीपूर्वक सल्लाही चाहत्यांनी दिला आहे.

Web Title: marathi singers prathamesh laghate and mugdha vaishampayan romantic long drive date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.