Tunisha Sharma : कधीकधी सत्यावर..., तुनिषाच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्रीचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 10:18 AM2022-12-25T10:18:47+5:302022-12-25T10:20:05+5:30

Tunisha Sharma Suicide: तुनिषाच्या निधनानंतर एका मराठी अभिनेत्रीने केलेल्या ट्वीटचीही चर्चा आहे.

marathi actress sneha wagh tweet after tv actress tunisha sharma suicide | Tunisha Sharma : कधीकधी सत्यावर..., तुनिषाच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्रीचं ट्वीट

Tunisha Sharma : कधीकधी सत्यावर..., तुनिषाच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्रीचं ट्वीट

googlenewsNext

अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma ) काल दुपारी मालिकेच्याच सेटवर गळफास लावून आयुष्य संपवलं. तिच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तुनिषाने आत्महत्या का करावी? असा प्रश्न सर्वांनाच छळत असताना तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा सहकलाकार व  एक्स बॉयफ्रेन्ड शिजान खानला अटक करण्यात आली आहे. काहीच दिवसांपूर्वी तुनिषा व शिजानचं ब्रेकअप झालं होतं. यामुळे तुनिषा नैराश्यात होती, अशी माहिती समोर येत आहे. तुनिषाच्या निधनानंतर एका मराठी अभिनेत्रीने केलेल्या ट्वीटचीही चर्चा आहे.

होय, तुनिषाच्या मृत्यूनंतर मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री स्रेहा वाघ हिने ट्वीट केलं आहे.

‘कधीकधी सत्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. तू खूप लवकर गेली... भावपूर्ण श्रद्धांजली... तुझ्या कुटुंबीय आणि मित्रांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो,’ अशा आशयाचं ट्वीट  स्रेहा वाघने केलं आहे.
स्नेहा वाघ हिने मराठीसह अनेक हिंदी मालिकात भूमिका साकारल्या.  बिग बॉस मराठीच्या तिसºया पर्वात स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती.  
 
कोण होती तुनिषा..

सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत तुनिषा मुख्य भूमिका साकारत होती. मालिकेच्या सेटवरच तिने गळफास लावून जीवन संपवलं.  या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता तुनिषा आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला.  

तुनिषाचे अभिनेता मोहम्मद शिझान खान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली आहे. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली आहे.

Web Title: marathi actress sneha wagh tweet after tv actress tunisha sharma suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.