मुहूर्त ठरला! जाहीरपणे प्रेमाची कबुली दिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितली तिच्या लग्नाची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 10:17 AM2023-08-30T10:17:18+5:302023-08-30T10:46:23+5:30

अभिनेत्रीने बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत थेट लग्नाची तारीख जाहिर केली आहे. .

Marathi actress meera joshi revled her wedding date with boyfriend nehul warule on social media | मुहूर्त ठरला! जाहीरपणे प्रेमाची कबुली दिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितली तिच्या लग्नाची तारीख

मुहूर्त ठरला! जाहीरपणे प्रेमाची कबुली दिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितली तिच्या लग्नाची तारीख

googlenewsNext

आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या पर्सनल आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता कायम त्यांच्या चाहत्यांना असते. सेलिब्रेटीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचा संपर्कात असतात. अगदी काहीच दिवसांपुर्वी अमृता देशमुश - प्रसाद जवादे या दोघांनी गुपचुप साखरपुडा करुन थेट लग्नाची तारीख जाहीर करुन सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीने सोशल प्लॅटफॉर्मवरुन आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. अभिनेत्रीने समुद्र किनाऱ्यावरील बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केला होता मात्र यात त्याचा चेहरा नव्हता दाखववला. 

मीराने बॉयफ्रेंडचा आणखी एक फोटो शेअर करत केला आहे. यावेळी तिने बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत थेट लग्नाची तारीख जाहिर केली आहे. . मीराच्या या फोटोवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. ५ सप्टेंबर २०२३ ला लग्न करणार असल्याचं समजतंय. 

मीरा जोशीचा बॉयफ्रेंड नेमका आहे तरी कोण? ती कोणाशी लग्नगाठ बांधणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली  आहे. मीरा जोशीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे नेहुल वारुळे. नेहुल हा अभिनेता आणि डान्सर असल्याचं समजतंय. 

मीरा जोशी ही अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना देखील आहे. मीरा अनेक डान्सच्या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली  होती. यातूनच तिचं अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं. चालू द्या तुमचं, शिवा, वृत्ती, लाल बत्ती, माझ्या बायकोचा प्रियकर अशा अनेक चित्रपटातून मीराने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Marathi actress meera joshi revled her wedding date with boyfriend nehul warule on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.