"तू है तो...", गिटार वाजवत गौतमी देशपांडेचा ट्रेडिंग गाण्यावर सूर, चाहत्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:38 IST2024-07-09T13:37:50+5:302024-07-09T13:38:20+5:30

अभिनयाबरोबरच गौतमीची एक वेगळी बाजू आता प्रेक्षकांसमोर आली आहे. आतापर्यंत पडद्यावर अभिनय केलेल्या गौतमीला गाताना पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

marathi actress gautami deshpande sing tu hai to on guitar netizens praise her watch video | "तू है तो...", गिटार वाजवत गौतमी देशपांडेचा ट्रेडिंग गाण्यावर सूर, चाहत्यांकडून होतंय कौतुक

"तू है तो...", गिटार वाजवत गौतमी देशपांडेचा ट्रेडिंग गाण्यावर सूर, चाहत्यांकडून होतंय कौतुक

गौतमी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने अभिनयाची वाट धरली. अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर तिने मराठी इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच गौतमीची एक वेगळी बाजू आता प्रेक्षकांसमोर आली आहे. 

गौतमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. सध्या गौतमीच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती गिटार वाजवत "तू है तो" हे ट्रेडिंग गाणं गाताना दिसत आहे. आतापर्यंत पडद्यावर अभिनय केलेल्या गौतमीला गाताना पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या सुमधूर आवाजाचं चाहत्यांनी कोतुक केलं आहे. 

"पहिल्यांदाच प्रयत्न केलाय...तुम्हाला आवडेल अशी आशा आहे", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. "खूप सुंदर आवाज आहे", "मस्त गातेस तू, ताई मला सुद्धा आवडलं गाणं", "किती छान आवाज" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेतून गौतमीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. 'माझा होशील ना' या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील गाणीही तिने गायली होती. गौतमीने गेल्याच वर्षी स्वानंद तेंडुलकरसह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title: marathi actress gautami deshpande sing tu hai to on guitar netizens praise her watch video