जब छाये मेरा जादू...! गौतमी पाटीलने फॉलो केला ट्रेंड, खास अंदाजात बनवला रील, चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:08 IST2025-06-13T13:04:32+5:302025-06-13T13:08:04+5:30

गौतमी पाटीलची सोशल मीडियावर हवा, नव्या व्हिडीओची होतेय चर्चा

lavani dancer gautami patil share special video on social media netizens react  | जब छाये मेरा जादू...! गौतमी पाटीलने फॉलो केला ट्रेंड, खास अंदाजात बनवला रील, चाहते म्हणाले...

जब छाये मेरा जादू...! गौतमी पाटीलने फॉलो केला ट्रेंड, खास अंदाजात बनवला रील, चाहते म्हणाले...

Gautami Patil: गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात परिचयाचं झालं आहे. आपल्या दिलखेचक अदा आणि ठसकेबाज लावणीने तरुणाईला मनावर राज्य करणाऱ्या गौतमीची कायमच चर्चा असते. सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून ती ओळखल्या जाणाऱ्या गौतमी पाटीलने आता अभिनय क्षेत्रात देखील एन्ट्री घेतली आहे. 'देवमाणूस' मालिकेच्या मधल्या अध्यायमधून ती छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच नुकतीच गौतमीने सोशल मीडियावर तिचा एक खास रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सगळ्याचं लक्ष तिने वेधून घेतलं आहे.


गौतमी पाटीलचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना उत्सुकता असते. गौतमी देखील सोशल मीडियावर तिचे वैयक्तिक आयुष्यासह अनेक गोष्टी शेअर करत त्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिसच्या ट्रेंडिंग गाण्यावर खास व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी घायाळ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अवघ्या काही क्षणांत चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. "खूप दिवस गौतमी ताई सुंदर एक परी एक अक्षरा तू मेरी रानी...", "So gorgeous madam...", अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, यापूर्वी गौतमीने व्हिडीओ अल्बम 'घुंगरू' तसेच काही चित्रपटांमध्ये झळकली आहे. त्याचबरोबर अलिकडेच गौतमीने स्टार प्रवाहच्या रिऍलिटी शो 'होऊ दे धिंगाणा'मध्ये हजेरी लावली होती. त्यात आता 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग रिएलिटी शोमध्येही ती पाहायला मिळाली.

Web Title: lavani dancer gautami patil share special video on social media netizens react