लागीरं झालं जी मालिकेमुळे गणेशला लागली आर्मीची ओढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 09:25 IST2018-05-15T03:55:48+5:302018-05-15T09:25:48+5:30

सध्या टीव्हीवर झी मराठी वाहिनीवरील 'लागिर झालं जी' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र महाराष्ट्राच्या घराघरात ...

Lageer happened due to Ganesha army army attraction! | लागीरं झालं जी मालिकेमुळे गणेशला लागली आर्मीची ओढ!

लागीरं झालं जी मालिकेमुळे गणेशला लागली आर्मीची ओढ!

्या टीव्हीवर झी मराठी वाहिनीवरील 'लागिर झालं जी' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. या मालिकेत काम करणाऱ्या गणेश नेवासे या कलाकाराची खऱ्या आयुष्यातही आर्मीत निवड झाली आहे. गणेश मूळचा साताऱ्यातील वाईचा. मालिकेत तो गेल्या काही महिन्यांपासून काम करत असून त्यात लष्करी प्रशिक्षण घेताना दिसला. ते करतानाच वास्तवातही लष्करात जाण्याचं स्वप्न त्याने पाहिलं. ते स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झालं आहे.

गणेशच्या घरची परिस्थिती तशी हलाखीची होती. पण तरीही त्याने देशसेवेची जिद्द धरली. गणेशची आता भारतीय ल्ष्काराच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. गणेश यापूर्वी एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. डिसेंबर महिन्यात त्यानं लष्करात जाण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर अलीकडेच त्याची लष्करात निवड झाल्याची समजलं आहे. आपल्या या प्रवासाबद्दल सांगताना तो म्हणाला की, ''आर्मीत जाण्याची आवड मला खूप आधीपासून होती. गेल्या तीन वर्षापासून एनसीसीमध्ये होतो. त्यानंतर पुढे वाईमधील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतो. आता देशाची सेवा करण्याची संधी मिळतेय ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं.'' लष्कराची आवड कशी निर्माण झाली याबद्दल तो सांगतो की, ''लष्कर म्हणजे काय? तिथे नेमकं काय होतं? या सगळ्या गोष्टींबद्दल मला माहिती नव्हती. मालिकेमध्ये काम मिळाल्यावर मला या गोष्टी समजल्या. आता प्रत्यक्षात माझं स्वप्न मी जगणार आहे. स्वत:ला तयार करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. मालिकेचं चित्रिकरण संपलं, की मी रात्री धावण्याचा सराव करायचो. यापूर्वी धावण्याच्या शर्यतींमध्ये राज्य स्तरापर्यंत मी मजल मारली आहे. आता पुढे आणखी मेहनत करत राष्ट्रीय पातळीवर खेळायचं आहे.''

Web Title: Lageer happened due to Ganesha army army attraction!