“आजही तुझ्या मन्नतपुढं रोज...”, शाहरुख खानसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “तुझ्या पोराला अडकवून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 02:04 PM2023-09-04T14:04:39+5:302023-09-04T14:05:34+5:30

"तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर...", किंग खानसाठी किरण मानेंच्या पोस्टने वेधलं लक्ष

kiran mane shared special post for shah rukh khan jawaan movie praises him | “आजही तुझ्या मन्नतपुढं रोज...”, शाहरुख खानसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “तुझ्या पोराला अडकवून..."

“आजही तुझ्या मन्नतपुढं रोज...”, शाहरुख खानसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “तुझ्या पोराला अडकवून..."

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये शाहरुखचा हटके अंदाज आणि सिनेमातील लूकची झलक पाहून चाहते भारावून गेले आहेत. ‘पठाण’नंतर किंग खानच्या ‘जवान’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. त्याचे चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत होते. आता शाहरुख ‘जवान’मधून बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीही किंग खानचे चाहते आहेत. बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुखचे मराठमोळे किरण मानेही फॅन आहेत.

शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलर पाहिल्यानंतर किरण मानेही भारावून गेले आहेत. त्यांनी शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

"बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर !"

अग्ग्गाय्यायायाया... अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा! पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या? तू हायेसच भन्नाट,जबराट,नादखुळा. तुझ्यावर जळनार्‍यांनी लै अफवा पसरवल्या दोस्ता, पन तू मागं हटला नाहीस. ट्रोलर्सच्या झुंडीनं तुला लै ट्रोल केला, लै हेटाळनी केली, पन तू भिडलास, नडलास, जिंकलास. तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवन्याचा प्रयत्न झाला, पन तू तर 'बाजीगर' ! गप र्‍हावून बाजी पलटलीस. परत ताठ कण्यानं, उंच मानेनं उभा र्‍हायलास. भक्कम. पाय रोवून. तुझी ती 'क़ातिल' नजर रोखून.  आजबी तुझ्या 'मन्नत'पुढं रोज अख्ख्या भारतातनं तरूण पोरंपोरी येऊन उभी र्‍हात्यात...तासनतास तुझ्या घराकडं बघत बसत्यात...त्यांना तुझ्या जातीधर्माशी घेनंदेनं नसतं. कारन ते तुझ्यासारखेच 'अस्सल' भारतीय असत्यात. तुझी एक झलक दिसली तर आनंदानं नाचायला लागत्यात...येडी होत्यात.

जगातला सगळ्यात लोकप्रिय कलाकार हायेस तू...तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर 'मानूस' म्हनूनबी तू 'किंग' हायेस! ॲसिड ॲटॅक झालेल्या हजारो महिलांची आयुष्य उभी करून दिलीयस तू. नानावटी हॉस्पीटलमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरसाठी तू जो वॉर्ड उभा केलायस त्यानं कित्येक चिमुरड्यांचे जीव वाचवलेत. तुझ्या अशा लै लै लै समाजोपयोगी कामांची जगभर दखल घेतली गेली हाय. युनेस्को अवॉर्ड मिळवलंयस. साऊथ कोरीयापास्नं इंग्लंडपर्यन्त अनेक देशांनी यासाठी तुला सन्मानित केलंय. त्यासाठी या देशातल्या प्रत्येक सच्च्या नागरीकाला तुझा अभिमान वाटतो !

'पठाण'च्या वेळी याच आपल्या खर्‍या देशानं दाखवून दिलं की, थयथयाट करत सेलिब्रिटींना शिवीगाळ करणार्‍या छितपूट ट्रोलर्सच्या पलीकडं, बहुसंख्य जनता आहे जी शांत असते, पन मानवतेच्या प्रसारासाठी निधड्या छातीनं लढनार्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी असते. पठाण सिनेमा म्हनून लै बरा नव्हता. तुझ्या ट्रोल्सना सनसनीत उत्तर म्हनून पब्लीकनं डोक्यावर घेतला. द ग्रेट, वन ॲन्ड ओन्ली शाहरूख खान, आता तुझा 'जवान' मात्र लै भारी असनार. लै आतुरतेनं वाट बघतोय. ये लवकर भावा...होऊ दे जाळ न् धूर संगट...चिखलात धुरळा, पान्यात आग काढ... आम्ही आहोत तुझ्यासोबत. बघनार. 'पठाण'सारखा परत परत बघनार. लब्यू भावा.

शाहरुख खानच्या ‘जवान’मधील ‘त्या’ डायलॉगवरुन वाद, पोलिसांत तक्रार दाखल

दरम्यान, शाहरुखचा ‘जवान’ येत्या ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटा नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण अशी कलाकारांची तगजी फौज आहे. मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: kiran mane shared special post for shah rukh khan jawaan movie praises him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.