ग्लॅमर सोडून ओरी स्टंट करताना दिसणार, ‘खतरों के खिलाड़ी’ मध्ये घेणार एन्ट्री, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:50 IST2026-05-06T16:49:37+5:302026-05-06T16:50:52+5:30

सेलिब्रिटींचा यारों का यार ओरी ‘खतरों के खिलाड़ी’ मध्ये दिसणार ! 'त्या' वक्तव्याची होतेय चर्चा

khatron ke khiladi 15 social media sensation orry will appear in this season | ग्लॅमर सोडून ओरी स्टंट करताना दिसणार, ‘खतरों के खिलाड़ी’ मध्ये घेणार एन्ट्री, म्हणाला...

ग्लॅमर सोडून ओरी स्टंट करताना दिसणार, ‘खतरों के खिलाड़ी’ मध्ये घेणार एन्ट्री, म्हणाला...

khatron ke khiladi 15 : बॉलिवूड पार्ट्यांमध्ये आणि कायम स्टारकिड्ससोबत वावरणारा सोशल मीडिया सेन्सेशन ओरी आता एका नव्या आणि वेगळ्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि सेलिब्रिटींचा यारो का यार अशी ओळख असलेल्या ओरीने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बऱ्याचदा सिनेसृष्टीतील उच्चभ्रू पार्टीमधील फोटोही ओरीमुळेच चाहत्यांना पाहायला मिळतात.

टॉप सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यापासून ते सोशल मीडियावरील मीम्समुळे कायम चर्चेत राहणाऱ्या ओरीचा आत्तापर्यंतचा प्रवास खूपच वेगळा राहिला आहे.  सध्या ओरी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आता ओरी टीव्ही जगतात पाऊल टाकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओरी लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी’च्या आगामी सिझनमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे चाहते आता ओरीला या सीझनमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या शोसाठी विचारणा झाल्यावर ओरीची प्रतिक्रिया देखील तितकीच मजेशीर होती.

यादरम्यान, आपल्या बेधडक आणि विनोदी अंदाजात ओरी म्हणाला, “जेव्हा त्यांनी मला ‘खतरों के खिलाड़ी’ करण्यास सांगितलं, तेव्हा मी विचारलं, हे आहे तरी काय? त्यांनी सांगितलं हा स्टंट शो आहे, तर मी म्हटलं, मला पब्लिसिटी स्टंट्स खूप आवडतात, तरी मला साइन करा. पण जेव्हा समजलं की हा खरंतर ‘फिअर फॅक्टर’सारखा शो आहे, तेव्हा मी थोडा घाबरलो, कारण मी खूप निडर नाही. मग वाटलं, चला काहीतरी वेगळं करून पाहू. कदाचित हे माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी चांगलं ठरेल, म्हणून मी इथे आलो. पुढे काय होईल माहित नाही, पण मी यासाठी पूर्ण तयार आहे. " असं ओरीने यावेळी सांगितलं.

नेहमीप्रमाणे ओरीचं हे विधानही सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे, त्याच्या या वक्तव्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. आजवर सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखला जाणारा ओरी आता ‘खतरों के खिलाड़ी’मध्ये कधीही न पाहिलेल्या अंदाजात दिसणार आहे. त्यामुळे या शोमध्ये ओरी काय कमाल करतो, हे पाहणं रंजक ठरेल.

Web Title : ओरी ग्लैमर छोड़ 'खतरों के खिलाड़ी' में, एंट्री पर कहा...

Web Summary : सोशल मीडिया सनसनी ओरी 'खतरों के खिलाड़ी' में शामिल। डर के बावजूद चुनौती स्वीकारते हुए मनोरंजन और जीवित रहने का वादा किया।

Web Title : Orry to ditch glamour, enters 'Khatron Ke Khiladi', says...

Web Summary : Orry, known for social media buzz, joins 'Khatron Ke Khiladi'. He humorously admits fear but embraces the challenge, promising entertainment and survival.