"आईला बोलवू का?", जया बच्चन यांचं नाव घेत अभिषेकने थेट वडिलांना दिली धमकी, बिग बी म्हणाले, मला नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 09:52 AM2023-08-17T09:52:46+5:302023-08-17T09:59:46+5:30

काही दिवसांपूर्वीच अभिषेकने आपल्या आईचा नेमका स्वभाव कसा आहे ते सांगितलं होते.

kaun banega crorepati 15 abhishek bachchan threatened taking name jaya bachchan in such a way that amitabh bachchan got scared | "आईला बोलवू का?", जया बच्चन यांचं नाव घेत अभिषेकने थेट वडिलांना दिली धमकी, बिग बी म्हणाले, मला नाही....

"आईला बोलवू का?", जया बच्चन यांचं नाव घेत अभिषेकने थेट वडिलांना दिली धमकी, बिग बी म्हणाले, मला नाही....

googlenewsNext

 ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन  (Jaya Bachchan) यांचा रागा अनेकवेळा पापाराझींना पाहून अनावर होते. त्यांचे फोटो काढलेले त्यांना फारस आवडत नाही मग त्या नाराज होता. यादरम्यानचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनने आईचा स्वभाव नेमका कसा आहे सांगितले होते. यावेळी तो म्हणाला होता, माझी आई  अजिबात कठोर नाही, ती प्रेमळ आहे. मात्र आता कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर त्याने आईच नाव घेत वडिलांना धमकावलं आहे. जाणून घेऊा नेमकं हे काय प्रकरण आहे ते. 

कौन बनेगा करोडपतीचा 15व्या नव्या सीझनसोबत अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर परतले आहेत. 15 ऑगस्टपासून याची सुरुवातही झाली. अभिषेक बच्चन सैयामी खेर आणि आर. बाल्की घूमरची टीम शोमध्ये आली आणि खूप मजा केली. शोमध्ये पोहोचताच अभिषेक बच्चनने सर्व नियम बदलले आणि स्वतः शोचा होस्ट बनला. यासोबतच अमिताभ बच्चन यांना हॉट सीटवर बसवले.

अभिषेकने बिग बींना पहिला प्रश्न विचाराला होता. पा मध्ये पा कोण होते?, यावर अमिताभ बच्चन यांनी बरोबर उत्तर देत अभिषेकचं नाव घेतलं, पण अभिषेक म्हणाला, चूक पा तर तुम्हीच आहात ना. यावर बिग बी म्हणतात, यार हा तर उलट खेळतोय. अभिषेकने उत्तर दिले, 'माझा खेळ माझे नियम'.

अभिषेक वडिलांना दुसरा मजेशीर प्रश्न विचारातो, आईपेक्षा तुम्ही किती उंच आहेत?, यावर अमिताभ हाताने इशारा करत उत्तर देत म्हणतात, ऐवढा. वडिलांची टेर खेचत अभिषेक म्हणातो, आईला बोलावू का इथं? यावर बिग बी म्हणतात, ''नको नको, मला नाही खेळायचं तुझ्यासोबत.'' अर्थात हा सगळा प्रकार गमतीचा भाग होता. 

अभिषेक बच्चनचा घूमर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, अभिषेक प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे तर सैयामी क्रिकेटरच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: kaun banega crorepati 15 abhishek bachchan threatened taking name jaya bachchan in such a way that amitabh bachchan got scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.