काजोल-अजय देवगनही म्हणतायेत 'चला हवा येवू द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 18:17 IST2016-10-18T18:16:07+5:302016-10-18T18:17:07+5:30

'चला हवा येवू द्या' या कार्यक्रमाची भुरळ  बॉलीवूड कलाकरांनाही पडतेय, हे शाहरूख खान, सलमान खान यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे कळाले. ...

Kajol-Ajay Devgan also said, 'let's get ready' | काजोल-अजय देवगनही म्हणतायेत 'चला हवा येवू द्या'

काजोल-अजय देवगनही म्हणतायेत 'चला हवा येवू द्या'

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">'चला हवा येवू द्या' या कार्यक्रमाची भुरळ  बॉलीवूड कलाकरांनाही पडतेय, हे शाहरूख खान, सलमान खान यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे कळाले. अनेक बॉलीवूड कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावत मराठी भाषा बोलून रसिकांचेही तुफान मनोरंजन केले. आता पुन्हा एकदा बॉलीवूडची एक गोड जोडी या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी सज्ज झालीय. ती जोडी म्हणजे काजोल आणि अजय देवगन. लवकरच अजय देवगन दिग्दर्शित 'शिवाय' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगन या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतोय.याचनिमित्ताने ही गोड जोडी आता 'चला हवा येवू द्या' च्या मंचावर उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे काजोलला मराठी भाषा समजतेही आणि उत्तम बोलताही येते. मात्र अजय देवगनलाला मराठी बोलता येत नसल्यामुळे अजयला काजोलने ''चला हवा येवू द्या'' हे कसे बोलावे शिकवत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केलाय. काजोल हे सगळे अजयला शिकवत असतांना अजयही मजेशीररित्या ''आता माझी सटकली'' अशी डायलॉगबाजी करत मस्तीच्या मूड मध्ये दिसतोय. इतका सराव केल्यानंतर लवकरच काजोल-अजयचा मराठी बाणा छोट्या पडद्यावर रसिकांना अनुभवता येणार हे मात्र नक्की.

Web Title: Kajol-Ajay Devgan also said, 'let's get ready'