लेकाच्या जन्मानंतर ७ महिन्यांत दीपिका पुन्हा गरोदर? व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 10:40 IST2024-02-13T10:38:08+5:302024-02-13T10:40:11+5:30

दीपिका कक्कर पुन्हा देणार गुडन्यूज? व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

is deepika kakar pregnant again video with husband shoaib ibrahim and son goes viral | लेकाच्या जन्मानंतर ७ महिन्यांत दीपिका पुन्हा गरोदर? व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

लेकाच्या जन्मानंतर ७ महिन्यांत दीपिका पुन्हा गरोदर? व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि शोएबच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं. दीपिकाने जूनमहिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. दीपिका आणि शोएबने त्यांच्या लेकाचं नाव रुहान असं ठेवलं आहे. आता दीपिका पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दीपिका आणि शोएबचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे दीपिका पुन्हा गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 

शोएब झलक दिखला जा ११मध्ये सहभागी झाला आहे. या शोच्या सेटच्या बाहेर शोएब पत्नी दीपिका आणि लेक रुहानबरोबर पापाराझींना पोझ देताना दिसत आहे. याचा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दीपिकाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. पण, तिने ओढणीने पोट लपवल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून दीपिका पुन्हा गरोदर आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. "ही पुन्हा गरोदर आहे असं वाटतंय", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "ती पुन्हा गरोदर आहे का?" असं म्हटलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत दीपिकाचं अभिनंदनही केलं आहे. 

'ससुराल सिमर का' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. तिने पायलट असलेल्या रौनक सॅणसनशी संसार थाटला होता. पण, अवघ्या ३ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दीपिका आणि शोएबने २०१८मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांना रुहान हा मुलगा झाला. हे दीपिकाचं दुसरं लग्न आहे. शोएबशी लग्न करण्यासाठी दीपिकाने मुस्लीम धर्म स्वीकारला होता. 

Web Title: is deepika kakar pregnant again video with husband shoaib ibrahim and son goes viral