​मी नैतिकच्या निर्णयाचा आदर करते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 22:11 IST2016-06-12T16:41:29+5:302016-06-12T22:11:29+5:30

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील नैतिक अर्थात करण मेहरा हा मालिका सोडणार आहे. मालिका सोडण्याचा करणचा निर्णय निश्चितपणे ...

I respect the ethical decision | ​मी नैतिकच्या निर्णयाचा आदर करते

​मी नैतिकच्या निर्णयाचा आदर करते

े रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील नैतिक अर्थात करण मेहरा हा मालिका सोडणार आहे. मालिका सोडण्याचा करणचा निर्णय निश्चितपणे धक्कादायक होता. करणची पत्नी निशा हिनेही करणच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. मालिकेतील करणची को-स्टार अक्षरा अर्थात हिना खान हिच्यासोबतच्या वादामुळे करण ही मालिका सोडतो, अशी चर्चा सध्या रंगलीय. हिनाला याबाबत विचारण्यात आल्यावर हे सर्व बकवास असल्याचे हिना म्हणाली. नैतिक हा मालिकेचा एक पिल्लर आहे. आम्ही सात वर्षांपासून सोबत काम करतोय. बेस्ट जोडीचे अनेक अवार्डही आम्ही जिंकले आहे. करणने ही मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला मला माहित नाही. पण हा त्याचा निर्णय आहे व आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर केला, एवढेच, असे हिना म्हणाली. करणच्या जाण्याने आमच्या चिंता वाढल्या आहेत. यामुळे शोच्या लोकप्रीयतेवर परिणाम होईल, आम्हाला ठाऊक आहे. पण आम्ही सगळे काही चांगले होईल,  अशीच आशा बाळगतो. आम्ही सर्व करणला खूप मिस करू,असेही सांगायला हिना विसरली नाही..
  

  

Web Title: I respect the ethical decision