मराठी कलाकारांची युरोपीय वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 10:55 IST2016-04-21T05:25:24+5:302016-04-21T10:55:24+5:30

यंदा मराठी कलाकारांसाठी हे वर्षे खूप भराभराटीचे आहे असे दिसते. कारण नुकतेच या कलाकारांनी सिडनी येथे धम्माल केलेले प्रत्येक ...

The European War of Marathi artists | मराठी कलाकारांची युरोपीय वारी

मराठी कलाकारांची युरोपीय वारी

दा मराठी कलाकारांसाठी हे वर्षे खूप भराभराटीचे आहे असे दिसते. कारण नुकतेच या कलाकारांनी सिडनी येथे धम्माल केलेले प्रत्येक क्षण आपण पाहिले आहे. आता हीच कलाकारमंडळी सध्या युरोपीय वारीवर असल्याचे दिसत आहे. कारण अभिनेता संदीप पाठक याने सोशलमिडीयाच्या माध्यमातून शेअर केलेल्या फोटोजच्या माध्यमातून दिसत आहे. संदीप पाठकचा नुकताच मकरंद अनासपुरेसोबत रंगापतंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. असो, पण  युरोपीय वारीचे निमित्त आहे, अकरावे युरोपीय साहित्य संमेलन. या संमेलनाबरोबर मराठी कलाकारांची सफर देखील लय भारी दिसत आहे. कारण संदीपने शेअर केलेल्या क्लिकच्या माध्यमातून ही मंडळी बेल्जिअम, बु्रख व अ‍ॅम्डपेरम या ठिकाणी फुल कल्ला करताना दिसत आहे. या क्लिकमध्ये संदीप पाठक, विदयाधर जोशी, महेश मांजरेकर, सुनिल बर्वे, भाऊ कदम या दिग्गज कलाकार दिसत आहे. असो या कलाकारांची ही युरोपीय वारी अशीच रंगू दे. 








Web Title: The European War of Marathi artists