'अग्निफेरा' मालिकेतून दोन दबंग वधू करतायेत छोट्या पडद्यावर एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 15:42 IST2017-03-17T10:12:41+5:302017-03-17T15:42:41+5:30

हिंदी सिरीयल्समध्ये सासू-सुना गेल्या काही वर्षात हिट झाल्यात.सासू आमि सुनेची भूमिकेत वेगवेळ्या अभिनेत्री झळकल्या आहेत.मात्र आता छोट्या पडद्यावर दोन ...

Entry on small screens for doing double-faced bridegrooms from 'Agnifera' series | 'अग्निफेरा' मालिकेतून दोन दबंग वधू करतायेत छोट्या पडद्यावर एंट्री

'अग्निफेरा' मालिकेतून दोन दबंग वधू करतायेत छोट्या पडद्यावर एंट्री

ंदी सिरीयल्समध्ये सासू-सुना गेल्या काही वर्षात हिट झाल्यात.सासू आमि सुनेची भूमिकेत वेगवेळ्या अभिनेत्री झळकल्या आहेत.मात्र आता छोट्या पडद्यावर दोन एक नाही तर दोन दोन दबंग सुनेची एंट्री होणार आहे.सृष्टी आणि रागिणी  या दोन्ही दबंग वधू लग्नाच्या गोंधळात अडकलेला एक असहाय्य बिचारा यांची ही विनोदी कौटुंबिक कथा 'अग्निफेरा' मालिकेत रंगणार आहे.या मालिकेत अंकित गेरा, युक्ती कपूर आणि सिमरन कौर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.या दोन्ही दबंग वधू साहसी  रागिणी तिच्या 'बंदूक की गोली' साठी ओळखली जाते तर सदाचारी सृष्टी सतत 'कानून की बोलीची' शपथ घेते.दोघीही धीट,शूर आणि काहीशा तापट स्वभावाच्या आहेत.विशेष म्हणजे या दोघांनाही अनुरागीच पत्नी बनायचे असते.

याविषयी अंकित गेरा म्हणाला,आजवर आपण पाहिलेल्या मालिकांपेक्षा अग्निफेरा मालिकेची संकल्पना फारच वेगळी आहे.हा काहीसा वेगळ्या प्रकारचा फॅमिली ड्रामा आहे.तो स्वभावाने काहीसा हट्टी आहे.अनेक बाबतीत तो त्याच्या मनासारखचे करतो.आपल्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार तो योग्य वधू शोधत असतो.मालिकेतील माझा हा नवी लुकही रसिकांना आवडले याची मला खात्री वाटत असल्याचे त्याने सांगितले.रागिणीची भूमिका करणारी युक्ती कपूर म्हणाली मालिकेतील माझी भूमिका स्वभावाने काहीशी रफ अँड टफ आहे,पण तरीही तिच्यामध्ये एक खास विनोदी शैली आहे.ज्यामुळे ती प्रेमळही वाटते.सृष्टीची भूमिका करणारी सिमरन कौरचीही पहिलीच मालिका असून पारंपारिक मुल्ये जपणारी आहे.ती पेशाने वकिल असल्यामुळे सतत नियमांनुसारच वागत असते.ही भूमिका तिच्या तिच्याशी खरोखर खूप मिळती जुळती असल्याचे तिने सांगितले. 

Web Title: Entry on small screens for doing double-faced bridegrooms from 'Agnifera' series