देबीनाला या कारणामुळे करावा लागला डबल रोल जाणून घ्या काय कारण आहे ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 04:37 PM2016-12-19T16:37:13+5:302016-12-19T16:37:13+5:30

'संतोषी मा' या पौराणिक मालिकेत पौलोमीची भूमिका साकारणारी  देबीना बॅनर्जी डबल रोलमध्ये झळकणार आहे. पहिल्यांदाचा ती अशाप्रकारे डबल रोल ...

Due to this reason Debbana has to do double roll know what is the reason? | देबीनाला या कारणामुळे करावा लागला डबल रोल जाणून घ्या काय कारण आहे ते?

देबीनाला या कारणामुळे करावा लागला डबल रोल जाणून घ्या काय कारण आहे ते?

googlenewsNext
'
;संतोषी मा' या पौराणिक मालिकेत पौलोमीची भूमिका साकारणारी  देबीना बॅनर्जी डबल रोलमध्ये झळकणार आहे. पहिल्यांदाचा ती अशाप्रकारे डबल रोल करणार असल्यामुळे खूप उत्सुकही आहे. तृष्णा असे देबिनाच्या दुस-या कॅरेक्टर आहे. देवलोकातील मत्सराची देवता पौलोमिनी संतोषीला(रतनसिंह राजपुतला) त्रास देण्यासाठी बरीच कट कारस्थानं रचली.आता पृथ्वी तलावर तृष्णाच्या रूपात संतोषी आणि धारियासाठी अडचणी निर्माण करेल.तृष्णा धारियाच्या घरी येते काही काळातच व्यवसायातील कुशाग्र बुध्दी आणि आकर्षक रूप यामुळे धारियाला ती आकृष्ट करण्याचा प्रयत्न करते. ती संतोषीविरोधात त्याला भडकवण्याचा आणि दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करते.पौलोमी आणि तृष्णा या दोघी वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे.''मी पहिल्यांदाच अशा प्रकारे डबल रोल साकारत आहे.एकाच मालिकेत दोन टोकांच्या भूमिका साकारण्याची खूप कमी कलाकरांना संधी मिळते.पौलोमिच्या रूपात मी प्रेकांना अगदी पारंपारिक लुकमध्ये दिसेन.तृष्णा बनत मी समकालीन आधुनिक रूपात दिसेन,तृष्णा बनत मालिकेत येणं हे कथेला क वेगळे वळण मिळेन त्यामुळे खूप हे रसिकांसाठी खूप रंजक ठरणार'' असल्याचे देबिनाने सांगितले. 

या मालिकेआधी देबीनाने रामायनमध्ये सीताची भूमिका साकारली होती. तर तिचा रिअल लाईफ पती गुरमित चौधरीने रामची भूमिका साकारली होती.  राम सीताच्या भूमिकेत देबीना आणि गुरमित या जोडीला रसिकांची खूप पसंती मिळाली होती. दरम्यान गुरमितला आता पौराणिक मालिकेत अडकायची नसल्यामुळे त्याने अनेक पौराणिक मालिकेच्या ऑफर्सना नकार दिला असून आता तो फक्त सिनेमांवर फोकस करणार असल्याचे खुद्द गुरमितने स्पष्ट केले होते. तर देबीनाही आपल्या करिअमध्ये तिला मिळणा-या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करते असल्याचे देबीनाने सांगितले.  

Web Title: Due to this reason Debbana has to do double roll know what is the reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.