"मुलगा झाला तर रुद्राक्ष आणि मुलगी झाली तर..."; दिव्यांका त्रिपाठीने केली बाळाच्या नावांवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 17:52 IST2026-04-26T17:51:51+5:302026-04-26T17:52:34+5:30
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. त्यानिमित्ताने एका व्लॉग व्हिडीओत हे दोघे बाळाच्या नावावर चर्चा करताना दिसले

"मुलगा झाला तर रुद्राक्ष आणि मुलगी झाली तर..."; दिव्यांका त्रिपाठीने केली बाळाच्या नावांवर चर्चा
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. दिव्यांका सातत्याने तिच्या गरोदरपणाचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. विवेकने नुकताच एक नवीन व्लॉग शेअर केला असून, त्यामध्ये त्याने बाळाच्या नावावरून सुरू असलेल्या चर्चेबद्दल आपला आनंद व्यक्त केला आहे.
काय ठेवणार बाळांची नावं
व्लॉगमध्ये विवेकने त्याच्या आवडीची काही नावे सांगितली. तो म्हणाला, "मला मुलीसाठी 'जोई' हे नाव खूप आवडते. हे खूप गोंडस नाव आहे, असे मला वाटते. पण दिव्यांकाला हे नाव आवडलेले नाही, त्यामुळे मी थोडा गोंधळलो आहे." यावर दिव्यांकाने आपली प्रतिक्रिया दिली की, "मला वाटते हे नाव आता थोडे जुने झाले आहे. मी जेव्हा लहान होते, तेव्हा एका गाण्यात 'कहकशा' हा शब्द ऐकला होता, जो मला खूप आवडला होता. आपण मुलीसाठी या नावाचा विचार करू शकतो." विवेकने 'कीशा' या नावाचाही पर्याय दिला, पण दिव्यांकाला हे नाव इतकं पसंत पडलं नाही.
मुलाच्या नावाबाबत बोलताना दिव्यांका म्हणाली, "मला मुलासाठी 'रुद्राक्ष' हे नाव खूप आवडते. हे भगवान शंकराच्या नावांपैकी एक आहे. पण 'रुद्र'चा अर्थ 'क्रोध' (राग) असाही होतो, त्यामुळे हे नाव ठेवावं की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे." मोठ्या चर्चेनंतर दोघांनीही 'रिदम' (Rhythm) या नावावर चर्चा केली. विवेक म्हणाला की, जर मुलगी झाली तर आपण तिचे नाव 'रिदम' ठेवू शकतो, कारण हे नाव आम्हा दोघांनाही खूप आवडले आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
या व्लॉगवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी 'रिदम' हे नाव आधुनिक आणि अर्थपूर्ण असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी दिव्यांकाने सुचवलेले 'कहकशा' हे नाव सुंदर असल्याचे सांगितले. काही चाहत्यांनी विवेकच्या 'जोई' या नावाचेही समर्थन केले आहे. सोशल मीडियावर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, चाहते त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक आहेत.