कॉमेडी क्वीन भारती सिंग देणार गुड न्यूज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 16:56 IST2019-01-07T16:56:00+5:302019-01-07T16:56:57+5:30

भारती सिंग सध्या कपिल शर्माचा नव्या शोमध्ये दिसते आहे. तसेच 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येदेखील ती स्टंट करताना दिसते आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील सहभागी झाला आहे.

Comedy Queen Bharti Singh to give good news? | कॉमेडी क्वीन भारती सिंग देणार गुड न्यूज ?

कॉमेडी क्वीन भारती सिंग देणार गुड न्यूज ?


छोट्या पडद्यावरील कॉमेडी क्वीन म्हणजेच भारती सिंग सध्या कपिल शर्माचा नव्या शोमध्ये दिसते आहे. तसेच 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येदेखील ती स्टंट करताना दिसते आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील सहभागी झाला आहे.


'खतरों के खिलाडी' में एक्शन व स्टंट व ताण-तणाव खूप असतो. मात्र भारतीमुळे या शोमध्ये विनोदीही अंदाज पाहायला मिळतो आहे. या शोमधील तिचा विनोदी अंदाज प्रेक्षकांना खळखळून हसवितो आहे. हर्ष व भारती स्टंट्स करताना हरले असून दोघेही एलिमेनेशन राउंडला पोहचले आहेत.

त्यांच्यासोबत या राउंडमध्ये विकास गुप्तादेखील आहे. त्यामुळे या तिघांमध्ये एकाचे हरणे निश्चित आहे. हर्ष एक स्टंट करताना त्रस्त असल्याचा दिसून आला तर भारतीची परिस्थितीदेखील सारखीच होती. भारतीला एक स्टंट करायला सांगितला. तेव्हा तिने ती प्रेग्नेंट असल्याचे सांगितले व म्हणाली की हा स्टंट मी नाही करू शकत. हे ऐकून सगळ्यांना हसू आवरले नाही. सर्वांना माहित आहे की भारती स्टंटपासून सुटका करून घेण्यासाठी बहाणा सांगते आहे. रोहित शेट्टीने तिचे अजिबात ऐकले नाही आणि तिला तो स्टंट करायला भाग पाडले.

'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोचा नवा सीझन नुकताच कलर्स टीव्हीवर दाखल झाला आहे. या शोमध्ये भारती सिंग तिचा नवरा हर्ष यांच्यासोबत विकास गुप्ता, क्रिकेटर श्रीसंत, कोरियोग्राफर पुनीत, गायक आदित्य नारायण यांच्यासोबत मालिकेतील कलाकार आहेत.


 

Web Title: Comedy Queen Bharti Singh to give good news?