​ब्रेकिंग : बिग बॉसमधून एलिना कझान आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 13:51 IST2016-12-03T13:51:23+5:302016-12-03T13:51:23+5:30

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहरे पडणार याची उत्सुकता लागलेली असताना सर्वांना आश्चर्याचा धक्का देत वाईल्ड कार्ड एन्ट्री ...

Breaking: Elisa Kane-out from Big Bash! | ​ब्रेकिंग : बिग बॉसमधून एलिना कझान आऊट!

​ब्रेकिंग : बिग बॉसमधून एलिना कझान आऊट!

ग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहरे पडणार याची उत्सुकता लागलेली असताना सर्वांना आश्चर्याचा धक्का देत वाईल्ड कार्ड एन्ट्री एलिना कझान एलिमिनेट झाली आहे.

मागच्या रविवारी सलमानने बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे चार जणांना प्रवेश देऊन बॉम्ब टाकला होता. जेसन शहा, एलिना कझान, साहिल आनंद आणि प्रियांका जग्गा हे चार सेलिब्रेटी आधीच घरात असणाऱ्या स्पर्धकांना ‘कांटे की टक्कर’ देण्यासाठी आले होते.

अखेर ‘डोम चॅलेंज’नंतर चार जणांना एलिमिनेशनसाठी नामांकित करण्यात आले. त्यामध्ये राहुल देव, व्हीजे बानी, जेसन शहा आणि एलिनाचा समावेश होता.

मग काय तर, प्रेक्षकांनी एलिनाला नाकारून बाहेरचा रस्ता दाखवला. खरे सांगायचे तर एलिनामध्ये बिग बॉससाठी लागणारा आवश्यक स्पार्क नव्हता. सात दिवसांच्या मुक्कामात तिने खास असे काहीच केले नाही. ती नुसती बसून राहिली. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ती कसलीच मेहनत घेताला दिसली नाही. तिची अशी थंड कामगिरी पाहून प्रेक्षकांनी तिला एलिमिनेट केले.

रशियन-जर्मन वंशाची एलिना विदेशी असूनही चांगले हिंदी बोलते. तिने काही चित्रपटांमध्ये कामसुद्धा केले आहे. गौरव चोप्रासोबत तिने एक सिनेमा केला असून अद्याप तो प्रदर्शित झालेला नाही. एका मराठी चित्रपटातही ती झळकली होती.


वाईल्ड कार्ड :सलमान खान आणि एलिना कझान

ओम स्वामींच्या पोठोपाठ आता एलिनालासुद्धा बिग बॉसच्या घरातील गाशा गुंडाळावा लागला. स्वामींच्या विरोधात बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटमुळे त्यांना घर सोडावे लागले. याबरोबरच या विकेंडला सलमान मोना आणि मनूला खास सरप्राईज देणार आहे.

ते सरप्राईज म्हणजे मोना आणि मनूचे रिअल प्रियकर या विकेंडला बिग बॉसच्या घरी येणार असून आपापल्या प्रियकरांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी जाब विचारणार आहेत. विकेंड स्पेशल एपिसोडसाठी मोनाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूत आणि मनूची होणारी पत्नी प्रिया सैनी विकेंड स्पेशल एपिसोडसाठी बिग बॉसच्या घरात येणार आहे.

Web Title: Breaking: Elisa Kane-out from Big Bash!