"...तर मीच जिंकलो असतो", 'बिग बॉस मराठी'मधून बाहेर पडताच विशाल कोटियनची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:17 IST2026-04-20T15:17:04+5:302026-04-20T15:17:32+5:30
विशाल कोटियनही 'बिग बॉस मराठी ६'च्या विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. मात्र, त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसमधून बाहेर येताच विशालने प्रतिक्रिया दिली आहे.

"...तर मीच जिंकलो असतो", 'बिग बॉस मराठी'मधून बाहेर पडताच विशाल कोटियनची पहिली प्रतिक्रिया
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा महाअंतिम सोहळा रविवारी(१९ एप्रिल) पार पडला. तन्वी कोलते हिने 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी नावावर केली. तर राकेश बापट उपविजेता ठरला. विशाल कोटियनही 'बिग बॉस मराठी ६'च्या विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. मात्र, त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसमधून बाहेर येताच विशालने प्रतिक्रिया दिली आहे.
पापाराझींशी बोलताना विशाल म्हणाला, "गेम चांगला होता. सगळे स्पर्धक उत्तम खेळत होते. गेम आहे, त्यामुळे कोणत्याच गोष्टीची खंत नाही. ५-६ आठवड्यांचा गेम असता तर, मीच जिंकलो असतो. १४ आठवड्यांचा हा गेम आहे, जो जिंकला त्यानं मेहनत घेतली आहे. सगळे स्पर्धक उत्तम खेळले. फिनालेपर्यंत जे पोहोचले, टॉप ३ पर्यंत जे पोहोचले, त्यांची मेहनत आहे, हीच मोठी गोष्टी आहे. ज्यांनी बिग बॉसच्या घरात १०० दिवसांचा प्रवास पूर्ण केला, माझ्यासाठी ते सर्व विनर आहेत. जे पोहोचू शकले नाहीत, त्यांनीही मेहनत घेतली. गेम आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही. मी स्पोर्ट्सपर्सन आहे, जिकणं आणि हरणं होत राहतं".
विशाल कोटियन बिग बॉस हिंदी १५मध्येही सहभागी झाला होता. त्या पर्वाची विजेती तेजस्वी प्रकाश ठरली होती. तर बिग बॉस मराठीची विजेती तन्वी कोलते ठरली. यावरुनही पापाराझींनी विशालला प्रश्न विचारला. तेव्हा विशालने हसत उत्तर दिलं की "म्हणजे मुलींचा मी लकी चार्म आहे ना". विशालने पहिल्या दिवसापासूनच त्याचा गेम खेळायला सुरुवात केली होती.