Bigg Boss Marathi 6: लावणी डान्सर राधा पाटील गेली घराबाहेर, जाताना म्हणाली- "यापुढे लावणी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 21:20 IST2026-01-25T21:16:34+5:302026-01-25T21:20:46+5:30

Bigg Boss Marathi 6 Elimination: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये पहिलं एलिमिनेशन झालं आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या पहिल्या एलिमिनेशमध्ये लावणी डान्सर राधा पाटील घराबाहेर गेली आहे.

Bigg Boss Marathi 6 Lavani dancer Radha Patil eliminate from the house | Bigg Boss Marathi 6: लावणी डान्सर राधा पाटील गेली घराबाहेर, जाताना म्हणाली- "यापुढे लावणी..."

Bigg Boss Marathi 6: लावणी डान्सर राधा पाटील गेली घराबाहेर, जाताना म्हणाली- "यापुढे लावणी..."

'बिग बॉस मराठी ६' मध्ये पहिलं एलिमिनेशन झालं आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या पहिल्या एलिमिनेशमध्ये लावणी डान्सर राधा पाटील घराबाहेर गेली आहे. या आठवड्यात प्रभू शेळके, अनुश्री माने, दिव्या शिंदे, सागर कारंडे, राधा पाटील, रोशन भजनकर, करण सोनावणे, दीपाली सय्यद, रुचिता जामदार हे ९ सदस्य नॉमिनेट होते. त्यापैकी राधा पाटीलने घराचा निरोप घेतला आहे. 

राधा पाटील जाताना काय म्हणाली?

नॉमिनेशनची घोषणा होताच राधा पाटीलला अश्रू अनावर झाले. रितेश देशमुखने तिला तिच्या भावना विचारल्या. त्यावेळी राधा म्हणाली, ''मला इतकंच म्हणायचं होतं की, आमचा शो घाणेरडा नाही. आम्ही पण लावणी व्यवस्थित करु शकतो. आणि याच्यापुढे लावणी व्यवस्थित करु.'' अशाप्रकारे राधाने तिच्या भावना व्यक्त केल्या. राधाच्या नावाची घोषणा होताच सर्व सदस्यांना अश्रू अनावर झाले. 

कोण आहे राधा पाटील?

'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेली राधा पाटील ही महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी आहे. राधाने महाराष्ट्रभरात तिच्या लावणीचे जाहीर कार्यक्रम केले आहेत. राधाची लावणी पाहायला महाराष्ट्रभरातून लोक गर्दी करतात. राधाने 'बिग बॉस मराठी ६'च्या मंचावर येताच गौतमी पाटीलला खुलं आव्हान केलं होतं. त्यामुळे घरात आल्या आल्याच राधा पाटील चर्चेत आली होती. परंतु खेळ कमी पडल्याने राधाला घर सोडावं लागलं. 

Web Title : बिग बॉस मराठी 6: लावणी डांसर राधा पाटिल बाहर हुईं।

Web Summary : लावणी डांसर राधा पाटिल बिग बॉस मराठी 6 से बाहर होने वाली पहली प्रतियोगी थीं। उन्होंने आंसुओं के साथ लावणी को सम्मानपूर्वक दिखाने का वादा किया। प्रवेश करते ही गौतमी पाटिल को चुनौती दी, लेकिन खेल में पिछड़ गईं।

Web Title : Bigg Boss Marathi 6: Lavani dancer Radha Patil evicted.

Web Summary : Radha Patil, a Lavani dancer, was the first to be eliminated from Bigg Boss Marathi 6. Tearful, she vowed to showcase Lavani respectfully. She challenged Gautami Patil upon entering, but her game fell short.