Bigg Boss Marathi 5: बिग बॉसमध्ये आला सर्वांचा लाडका DP! धनंजय पोवारने येताच केला कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 23:02 IST2024-07-28T23:01:53+5:302024-07-28T23:02:23+5:30

Bigg Boss Marathi 5: उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी अशी धनंजय पोवारची ओळख आहे.

Bigg Boss Marathi 5 social media influencer Dhananjay powar entered in Bigg Boss | Bigg Boss Marathi 5: बिग बॉसमध्ये आला सर्वांचा लाडका DP! धनंजय पोवारने येताच केला कल्ला

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसमध्ये आला सर्वांचा लाडका DP! धनंजय पोवारने येताच केला कल्ला

Bigg Boss Marathi 5: यंदा बिग बॉस मराठी पाचव्या पर्वात दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची एन्ट्री झाली आहे. पहिली म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर तर आता आला आहे कोल्हापूरचा धनंजय पोवार (Dhananjay Powar). आपल्या रील्सने सर्वांना हसवणारा धनंजय आता बिग बॉसमधून अख्ख्या महाराष्ट्राला हसवणार आहे. 

उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी अशी धनंजय पोवारची ओळख आहे. त्याच्या येण्याने घरात मजा येणार हे नक्की. रितेशने आधी धनंजयचं स्वागत केलं. नंतर त्याला बिग बॉसच्या डायलेमाबद्दल सांगिचलं. धनंजयचं सर्वात आवडतं मटण की 10 हजारांची बिग बॉस करन्सी यातले पर्याय त्याला निवडायला लावले. यावर धनंजयने मटणच निवडलं. यानंतर धनंजयने घरात प्रवेश केला आहे.


धनंजय पोवारच्या एन्ट्रीनंतर 'आपला लाडका दादा DP' अशा कमेंट्स आतापासूनच सुरु झाल्या आहेत. यावेळी बिग बॉसमध्ये खरोखरंच कल्ला होणार आहे. रितेश देशमुखचं होस्टिंग आणि वेगवेगळ्या स्पर्धकांचा कल्ला हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. १०० दिवस स्पर्धक घरात राहणार असून दर आठवड्याला नॉमिनेश प्रक्रिया पार पडणार आहे. तसंच वीकेंड का वार मध्ये रितेश देशमुख कोणाकोणाची शाळा घेतो हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 5 social media influencer Dhananjay powar entered in Bigg Boss