Bigg Boss Marathi 5: भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, रितेश देशमुखसह खिलाडी कुमार घेणार सदस्यांची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 16:24 IST2024-08-10T16:23:52+5:302024-08-10T16:24:22+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, 'बिग बॉस मराठी'मध्ये खिलाडी कुमारची एन्ट्री

bigg boss marathi 5 akshay kumar to seen in bhaucha dhakka with ritesh deshmukh watch promo | Bigg Boss Marathi 5: भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, रितेश देशमुखसह खिलाडी कुमार घेणार सदस्यांची शाळा

Bigg Boss Marathi 5: भाऊच्या धक्क्यावर येणार अक्षय कुमार, रितेश देशमुखसह खिलाडी कुमार घेणार सदस्यांची शाळा

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसरा आठवडाही स्पर्धकांनी गाजवला. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने दिलेल्या सल्ल्यांचं काही स्पर्धकांनी अनुकरण केलं. तर काहींनी पुन्हा पु्न्हा त्याच चुका केल्याचं पाहायला मिळालं. काही सदस्यांकडून पुन्हा वर्षा उसगावकरांचा अपमान झाला. तर टास्कदरम्यानही स्पर्धकांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण आठवड्यानंतर आता वेळ झाली आहे ती रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याची. 

बिग बॉस मराठी ५ च्या दुसऱ्या आठवड्यातील भाऊचा धक्का आज होणार आहे. पण, यंदाचा धक्का खऱ्या अर्थाने खास असणार आहे. कारण, यंदाच्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार येणार आहे. अक्षय कुमार रितेश देशमुखसह स्पर्धकांची शाळा घेणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ कलर्सच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबरोबरच प्रेक्षकांसाठीही यंदाच्या आठवड्यातील भाऊचा धक्का खास असणार आहे. अक्षय त्याचा आगामी सिनेमा 'खेल खेल मे'च्या प्रमोशनसाठी बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच अक्षय कुमार बिग बॉस मराठीमध्ये दिसणार आहे.


दरम्यान, पहिल्या आठवड्यात किर्तनकार पुरषोत्तम दादा पाटील यांचा प्रवास संपला होत. या आठवड्यात निक्की तांबोळी, योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोणाचा प्रवास या आठवड्यात संपेल, हे लवकरच कळणार आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

Web Title: bigg boss marathi 5 akshay kumar to seen in bhaucha dhakka with ritesh deshmukh watch promo