अंकिता म्हणतेय मी आहे सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 12:21 IST2016-06-27T06:51:48+5:302016-06-27T12:21:48+5:30

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग रजपुत यांच्या ब्रेकअपनंतर अंकिताने आपला भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा विचार केला आहे असे म्हटले ...

Ankita says that I am single | अंकिता म्हणतेय मी आहे सिंगल

अंकिता म्हणतेय मी आहे सिंगल

किता लोखंडे आणि सुशांत सिंग रजपुत यांच्या ब्रेकअपनंतर अंकिताने आपला भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा विचार केला आहे असे म्हटले जात होते. अभिनेता कुशाल टंडन आणि अंकिता सध्या अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत त्या दोघांचे एकत्र फोटोही अंकिता तिच्या सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करत आहे. त्यामुळे दाल में कुछ काला है अशी चर्चा सुरू आहे. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे अंकिताने म्हटले आहे. अंकिताने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना हा संदेश दिला आहे. तिने म्हटले आहे की, मी सध्या तरी सिंगल आहे. मी कोणाच्या प्रेमात पडली तर मी स्वतःहून माझ्या फॅन्सना सांगेन. सध्या कोणीही माझ्याबाबत काहीही अफवा पसरवू नयेत. 

Web Title: Ankita says that I am single