वाह! लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी अक्षयने बायकोला चक्क घरच केलं गिफ्ट, पोस्ट लिहित म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:12 IST2026-05-09T12:11:25+5:302026-05-09T12:12:00+5:30

अक्षयने बायकोच्या पोस्टवर उत्तर देत लिहिले...

akshay kelkar gifts a new home in mumbai to his wife on their first marriage anniversary shares post | वाह! लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी अक्षयने बायकोला चक्क घरच केलं गिफ्ट, पोस्ट लिहित म्हणाली...

वाह! लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी अक्षयने बायकोला चक्क घरच केलं गिफ्ट, पोस्ट लिहित म्हणाली...

मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकर चर्चेत आहे. साधना काकतकरसोबत त्याने गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली होती. आज हे जोडपं लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. यासोबत आजचा दिवस त्यांच्यासाठी आणखी खास आहे कारण अक्षयने बायकोला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून चक्क मुंबईत नवं घर दिलं आहे. दोघांनी या नवीन घरात प्रवेश केला असून साधनाने अक्षयसाठी गोड पोस्ट लिहिली आहे.

साधना काकतकरने नवीन घराचे फोटो शेअर करत लिहिले,
"प्रिय नवरा,
मुंबईत हे हक्काचं घेणं तुझ्यासाठी कधीच सोपं नव्हतं. पण तू ते करुन दाखवलंस. आज आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तू मला इतकं मोठं गिफ्ट दिलंस. मला इतक्या योग्य आणि छान पद्धतीने लाडावून ठेवल्याबद्दल तुझे आभार. एक अख्खं नवं घर गिफ्ट करणं? तू खरंच वेडा आहे. तुझ्याशिवाय मी माझ्या अस्तित्वाची कल्पनाही करु शकत नाही. माझ्या सर्व निर्णयांबद्दल मी तुझ्याशी कधी चर्चा करायला लागले मला कळलंच नाही आणि कधीही न हरता सतत परिस्थितीचा सामना करणं हे तू मला शिकवलंस. यासोबतच तू मला एक स्ट्राँग स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही घडवत आहेस. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप ."


बायकोच्या या पोस्टवर अक्षयने कमेंट करत लिहिले, "तू आनंदाच्या या प्रत्येक क्षणासाठी पात्र आहेस. तुझं स्वप्न सत्यात उतरताना पाहणं ही माझ्यासाठी सर्वोत्तम भावना आहे. आपण एकत्र मिळून पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण करण्याकडे टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. आपल्या नात्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी तुझे खूप आभार. मला तुझा कायम अभिमान वाटतो बायको."

अक्षय आणि साधनावर त्यांचा मित्रपरिवार आणि चाहत्यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. लग्नाआधी अक्षय आणि साधना १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. बिग बॉसमध्ये असतानाच अक्षयने मला गर्लफ्रेंड आहे असं सांगितलं होतं. तिचा उल्लेख त्याने 'रमा' असा केला होता. ही रमा नक्की कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. नंतर अक्षयने एका पोस्टमधून सर्वांशी साधनाची ओळख करुन दिली होती. अक्षयच्या युट्यूबमधील अनेक व्हिडीओंमध्ये साधना होती हे चाहत्यांना नंतर क्लिक झालं. साधना काकतकर उत्तम गायिकाही आहे. दोघांची जोडी सिनेइंडस्ट्रीत लोकप्रिय आहे.

Web Title : अक्षय ने पहली वर्षगांठ पर पत्नी को घर गिफ्ट किया!

Web Summary : अभिनेता अक्षय केळकर ने अपनी पत्नी, साधना काकतकर को पहली शादी की सालगिरह पर मुंबई में एक नया घर उपहार में दिया। साधना ने तस्वीरें और एक हार्दिक पोस्ट साझा करते हुए अपनी कृतज्ञता व्यक्त की। शादी से पहले 10 साल तक डेटिंग करने वाले इस जोड़े को प्रशंसकों और दोस्तों ने सराहा।

Web Title : Akshay gifts wife a house on their first anniversary!

Web Summary : Actor Akshay Kelkar gifted his wife, Sadhana Kakatkar, a new house in Mumbai on their first wedding anniversary. Sadhana shared photos and a heartfelt post expressing her gratitude. The couple, who dated for 10 years before marrying, are celebrated by fans and friends.