स्वप्निल निघाला लंडनला

By Admin | Published: March 28, 2017 04:40 AM2017-03-28T04:40:27+5:302017-03-28T04:40:27+5:30

स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त काही दिवसांपूर्वी पार पडला होता

Swannel leaves London | स्वप्निल निघाला लंडनला

स्वप्निल निघाला लंडनला

googlenewsNext

स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त काही दिवसांपूर्वी पार पडला होता. बॉलिवूडचा कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून याआधी गणेशने बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शित केले होते. आता तो 'स्वामी तिन्ही जगाचा.. भिकारी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर भाष्य करणारा भावनिक विषय या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील काही गाण्यांचे आता लंडनमध्ये चित्रीकरण होणार आहे आणि या चित्रीकरणासाठी स्वप्निल जोशी लवकरच लंडनला रवाना होणार आहे. स्वप्निल या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आठ दिवसांसाठी लंडनला जाणार आहे. याविषयी स्वप्निल सांगतो, "मी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला लवकरच जात असून तिथे आम्ही दोन गाण्यांचे चित्रीकरण करणार आहोत. या चित्रपटात रुचा माज्यासोबत प्रमुख भूमिकेत असून ही दोन्ही गाणी माज्यावर आणि रुचावर चित्रीत होणार आहेत.

Web Title: Swannel leaves London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.