लग्नानंतर दोन महिन्यांतच गरोदर राहिली अभिनेत्री, थाटामाटात पार पडलं बेबी शॉवर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 11:00 IST2024-04-06T10:59:34+5:302024-04-06T11:00:47+5:30

काहीच महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता थाटामाटात तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.

south actress amala paul pregnant soon to be mom baby shower photo viral | लग्नानंतर दोन महिन्यांतच गरोदर राहिली अभिनेत्री, थाटामाटात पार पडलं बेबी शॉवर, पाहा फोटो

लग्नानंतर दोन महिन्यांतच गरोदर राहिली अभिनेत्री, थाटामाटात पार पडलं बेबी शॉवर, पाहा फोटो

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल गरोदर आहे. काहीच महिन्यांपूर्वी अमालाने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. अमालाने बेबी बंपचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता थाटामाटात अमालाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. 

पारंपरिक गुजराती पद्धतीने अमालाचं बेबी शॉवर पार पडलं. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे. अमालाच्या चेहऱ्यावर तिच्या प्रेग्नंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसून येत आहे. अमालाबरोबर फोटोत तिचा पती जगत देसाईदेखील दिसत आहे. बेबी शॉवरसाठी घर फुलांच्या माळांनी सजवल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

अमालाने नोव्हेंबर २०२३ मध्ये जगत देसाईशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. आता ते आईबाबा होणार आहेत. अमालाचं हे दुसरं लग्न आहे. अमालाने २०१४मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक ए एल विजयशी लग्न करत संसार थाटला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या तीनच वर्षांत घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यानंतर अमाला पुन्हा नव्याने तिच्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

Web Title: south actress amala paul pregnant soon to be mom baby shower photo viral