लग्नाचं आमिष दाखवून गाडी घेतली, सोनं उकळलं! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीकडून NRI तरुणाची ९ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:54 IST2026-04-27T09:50:44+5:302026-04-27T09:54:16+5:30

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लग्नाचं आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीने NRI सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून पैसे उकळून त्याची फसवणूक केल्याची गोष्ट समोर आहे.

Police Complaint Against bigg boss fame Ashu Reddy for ₹9.35 Cr Fraud Case to nri | लग्नाचं आमिष दाखवून गाडी घेतली, सोनं उकळलं! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीकडून NRI तरुणाची ९ कोटींची फसवणूक

लग्नाचं आमिष दाखवून गाडी घेतली, सोनं उकळलं! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीकडून NRI तरुणाची ९ कोटींची फसवणूक

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लग्नाचं आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीने NRI सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून पैसे उकळून त्याची फसवणूक केल्याची गोष्ट समोर आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे आशू रेड्डी. हैदराबादमधील सेंट्रल क्राईम स्टेशन (CCS) मध्ये 'बिग बॉस तेलुगू' फेम आशू रेड्डी विरुद्ध ही फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. लग्नाच्या नावाखाली एका NRI सॉफ्टवेअर इंजिनिअरची ९.३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीवर ठेवण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
 

ही तक्रार सत्यनारायण नावाच्या व्यक्तीने दाखल केली असून, त्यांचा मुलगा वाय. व्ही. धर्मेंद्र सध्या लंडनमध्ये काम करत आहे. रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये भारतात आला असताना धर्मेंद्रची ओळख आशू रेड्डीशी झाली होती. अभिनेत्रीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे वचन दिले, असा आरोप करण्यात आला आहे. या भावनिक संबंधाचा फायदा घेत तिने विविध कारणांसाठी त्याच्याकडून मोठी रक्कम घेण्यास सुरुवात केली.

गाड्या, फ्लॅट्स आणि ५ किलो सोने

तक्रारीनुसार, आशू रेड्डीने धर्मेंद्रला तिच्यासाठी कार, फ्लॅट्स आणि सुमारे ५ किलो सोने खरेदी करण्यास भाग पाडले. ही सर्व मालमत्ता तिने स्वतःच्या नावावर नोंदवून घेतल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला अभिनेत्रीच्या कुटुंबानेही या लग्नाला पाठिंबा दर्शवत धर्मेंद्रचा विश्वास जिंकला, मात्र नंतर त्यांनी या प्रकरणात हात वर केले. धर्मेंद्रच्या वडिलांच्या दाव्यानुसार, २०२५ पर्यंत त्यांच्या मुलाने अभिनेत्रीला सुमारे ९.३५ कोटी रुपये दिले आहेत. ज्यात रोख रक्कम, दागिने आणि मालमत्ता यांचा समावेश आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबातील व्यक्तीही यात सहभागी असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे सीसीएस (CCS) पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका मांगली हिच्यावरही १० कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप झाले होते.

कोण आहे आशू रेड्डी?

आशू रेड्डी सोशल मीडियावर सक्रीय असून ती 'बिग बॉस तेलुगू' या रिअॅलिटी शोमुळे घराघरांत पोहोचली. चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबतच्या एका वादग्रस्त मुलाखतीमुळे ती अधिक चर्चेत आली होती. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या आशू रेड्डीने या प्रकरणावर किंवा पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title : बिग बॉस फेम अभिनेत्री पर एनआरआई को 9 करोड़ रुपये ठगने का आरोप

Web Summary : बिग बॉस तेलुगु फेम अभिनेत्री आशु रेड्डी पर शादी का झांसा देकर एक एनआरआई सॉफ्टवेयर इंजीनियर से 9.35 करोड़ रुपये ठगने का आरोप है। कथित तौर पर उसने धन का उपयोग करके कार, फ्लैट और सोना खरीदा। पुलिस शिकायत की जांच कर रही है।

Web Title : Bigg Boss Fame Actress Accused of Defrauding NRI of ₹9 Crore

Web Summary : Actress Ashu Reddy, of Bigg Boss Telugu fame, is accused of defrauding an NRI software engineer of ₹9.35 crore under the pretense of marriage. She allegedly acquired cars, flats, and gold using the funds. Police are investigating the complaint.