तृषाच्या 'करुप्पू' सिनेमात CM थलपती विजय यांची सरप्राइज एन्ट्री, थिएटरमध्ये टाळ्या अन् शिट्ट्या; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:44 IST2026-05-15T16:43:54+5:302026-05-15T16:44:24+5:30

'करुप्पू' सिनेमाच्या सुरुवातीलाच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि साऊथ सुपरस्टार जोसेफ विजय यांची एन्ट्री पाहून चाहते थक्क झाले.

CM Thalapathy Vijay surprise entry in Trisha krishnan movie Karuppu theatre video viral | तृषाच्या 'करुप्पू' सिनेमात CM थलपती विजय यांची सरप्राइज एन्ट्री, थिएटरमध्ये टाळ्या अन् शिट्ट्या; व्हिडीओ व्हायरल

तृषाच्या 'करुप्पू' सिनेमात CM थलपती विजय यांची सरप्राइज एन्ट्री, थिएटरमध्ये टाळ्या अन् शिट्ट्या; व्हिडीओ व्हायरल

साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनच्या ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'करुप्पू' सिनेमा अखेर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून तृषा आणि साऊथ अभिनेता सूर्या यांची जोडी तब्बल २१ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. १४ मे रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा आज शुक्रवारी(१५ मे) रिलीज करण्यात आला. सिनेमा रिलीज होताच चाहत्यांना आणखी एक मोठं सरप्राइज मिळालं आहे. 

'करुप्पू' सिनेमाच्या सुरुवातीलाच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि साऊथ सुपरस्टार जोसेफ विजय यांची एन्ट्री पाहून चाहते थक्क झाले. तृषाच्या सिनेमात थलपती विजय यांची सरप्राइज एन्ट्री पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विजय यांची एन्ट्री होताच थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'करुप्पू' सिनेमाच्या सुरुवातीला चित्रपटाच्या टीमकडून मुख्यमंत्री झाल्याबद्दल जोसेफ विजय यांचं अभिनंदन करत त्यांना धन्यवाद दिले आहेत. मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचे काही क्षणही या व्हिडीओत दिसत आहेत. थिएटरमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

'करुप्पू' सिनेमा तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर थलपती विजय यांनी 'करुप्पू' सिनेमाबाबत मोठा निर्णय घेत या सिनेमाच्या सकाळी ९ वाजताच्या शोला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र नंतर सिनेमाचे शो रद्द करण्यात आले. इतक्या वर्षांनी तृषा आणि सूर्याला एकत्र पाहून चाहतेही खूश झाले आहेत. 

Web Title : तृषा की 'करुप्पू' फिल्म: सीएम थलपति विजय की सरप्राइज एंट्री से प्रशंसक रोमांचित।

Web Summary : तृषा की 'करुप्पू' रिलीज़ हुई, जिसमें वह 21 साल बाद सूर्या के साथ फिर से दिखीं। तमिलनाडु के सीएम विजय की फिल्म की शुरुआत में अचानक उपस्थिति ने सिनेमाघरों में उत्साह और तालियां बटोरीं। फिल्म टीम ने विजय को सीएम बनने पर बधाई दी।

Web Title : Trisha's 'Karuppu' movie: CM Thalapathy Vijay's surprise entry thrills fans.

Web Summary : Trisha's 'Karuppu' released, reuniting her with Suriya after 21 years. Tamil Nadu's CM Vijay's surprise appearance at the beginning of the movie sparked cheers and applause in theaters. The movie team congratulated Vijay for becoming CM.