इकडे थलापती विजयची निवडणुकीत आघाडी, तिकडे अभिनेत्रीचं तिरुपती मंदिरात दर्शन, दोघांच्या अफेअरची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 12:12 IST2026-05-04T12:08:21+5:302026-05-04T12:12:22+5:30
अभिनेता थलापती विजयचा TVK पक्ष सध्या आघाडीवर आहे. अशातच विजयची ज्या अभिनेत्रीसोबत अफेअरची चर्चा रंगतेय ती तिरुपती मंदिरात निवडणूक निकालाच्या दिवशी दर्शन घेऊन आली आहे.

इकडे थलापती विजयची निवडणुकीत आघाडी, तिकडे अभिनेत्रीचं तिरुपती मंदिरात दर्शन, दोघांच्या अफेअरची चर्चा
सध्या देशात निवडणुकीच्या निकालाची चर्चा आहे. अभिनेता थलापती विजयचा TVK पक्ष सध्या आघाडीवर आहे. TVK पक्ष आतापर्यंत ७५ जागांवर आघाडीवर आहे. थलापती विजय निवडणुकीत बाजी मारत असताना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्या तिरुमला तिरुपती देवस्थान भेटीची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. विजय आणि तृषाच्या अफेअरच्या चर्चा रंगत असतानाच अभिनेत्रीची तिरुपती मंदिरातील ही भेट लक्ष वेधून घेत आहे.
तृषाने नुकतेच तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विधीवत पूजा अर्चा केली. तामिळनाडूमध्ये निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच तृषाने पहाटे लवकर मंदिरात भेट आली. या भेटीचा थेट संबंध तिचे चाहते अभिनेता आणि राजकीय नेते विजय थलापती याच्याशी जोडत आहेत. विजय थलपतीने त्याच्या 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाद्वारे यंदाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवली आहे. त्यामुळे विजयला निवडणुकीत घवघवीत यश मिळावं म्हणून तृषा तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेली असल्याची चर्चा आहे.
#WATCH | Andhra Pradesh: Actor Trisha Krishnan had the darshan of Lord Sri Venkateswara Swamy at Tirumala Tirupathi Devasthanam earlier this morning. pic.twitter.com/mhiaHMOu5l
— ANI (@ANI) May 4, 2026
चाहत्यांच्या मते, तृषाने तिरुपती बालाजीकडे विजय थलापतीच्या राजकीय भविष्यासाठी आणि निवडणुकीत त्याच्या पक्षाला घवघवीत यश मिळावे यासाठी साकडे घातले असावे. यापूर्वी तृषाने चेन्नईमध्ये आपल्या आईसोबत मतदानाचा हक्क बजावला होता, ज्याचे व्हिडिओ देखील त्यावेळी चर्चेत आले होते.
आता निकालांच्या दिवशीच तिने तिरुपतीचे दर्शन घेतल्याने तामिळनाडूच्या राजकारणात आणि चित्रपटसृष्टीत या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. तृषा आणि थलापती विजय यांनी अधिकृतपणे सांगितलं नसलं तरीही दोघांच्या अफेअरच्या चर्चा सध्या गाजत आहेत. थलापती विजयचा काहीच दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर तो तृषासोबत जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतो.