दिग्गज कलाकारांसोबत सिद्धार्थ चांदेकरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2016 02:10 AM2016-09-07T02:10:05+5:302016-09-07T02:10:05+5:30

सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी हे प्रेक्षकांचे लाडके कलाकार वारस या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत.

Siddhartha Chandekar with veteran stars | दिग्गज कलाकारांसोबत सिद्धार्थ चांदेकरही

दिग्गज कलाकारांसोबत सिद्धार्थ चांदेकरही

googlenewsNext

सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी हे प्रेक्षकांचे लाडके कलाकार वारस या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. ही गुरू-शिष्य जोडी वारस या चित्रपटात झळकणार असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागलेली आहे. सिद्धार्थ चांदेकरही या चित्रपटाचा भाग असणार आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना सिद्धार्थ सांगतो, ‘‘सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी या स्टार कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते हे मला कळल्यावर मी आनंदित झालो होतो. कामाच्या बाबतीत हे दोघेही खूपच प्रोफेशनल आहेत. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात. वारस या चित्रपटातून खूप सुंदर संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.’’

Web Title: Siddhartha Chandekar with veteran stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.