धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीवर नातेवाईकांकडून चाकू हल्ला; भररस्त्यात बलात्कार आणि हत्येची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:44 IST2026-01-27T17:42:24+5:302026-01-27T17:44:24+5:30

Kannada actress family dispute news कन्नड अभिनेत्री काव्या गौडाच्या पतीवर नातेवाईकांकडून जीवघेणा हल्ला. कौटुंबिक वादातून पती सोमशेखरला भोसकले. काव्याला बलात्कार आणि हत्येची धमकी. वाचा सविस्तर वृत्त.

Shocking! Kannada actress Kavya Gowda's husband attacked with a knife by relatives; Threatened with rape and murder on the street | धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीवर नातेवाईकांकडून चाकू हल्ला; भररस्त्यात बलात्कार आणि हत्येची धमकी

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीवर नातेवाईकांकडून चाकू हल्ला; भररस्त्यात बलात्कार आणि हत्येची धमकी

बेंगळुरू: लोकप्रिय कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री काव्या गौडा हिच्या कुटुंबातील वादाने हिंसक वळण घेतले आहे. बेंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी झालेल्या वादात काव्याचा पती सोमशेखर याच्यावर नातेवाईकांनी चाकूने हल्ला केला. या घटनेत सोमशेखर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

हा वाद काव्या आणि सोमशेखर यांच्या दोन वर्षांच्या मुलीच्या देखभालीसाठी ठेवलेल्या 'सुमा' नावाच्या मुलीवरून सुरू झाला. सोमशेखरचा भाऊ आणि त्याच्या पत्नीने सुमावर दागिने चोरीचा खोटा आरोप लावला होता. सोमवारी (२६ जानेवारी) रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी आरोपींनी काव्याच्या मुलीवर हात उचलण्याचा प्रयत्न केला, ज्याला काव्याने विरोध केला. यानंतर सोमशेखरचा भाऊ नंदिश, त्याची पत्नी प्रेमा, प्रेमाचे वडील रवी कुमार आणि बहीण प्रिया यांनी काव्या आणि सोमशेखरवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या झटापटीत सोमशेखरवर चाकूने वार करण्यात आले.

गंभीर आरोप आणि धमक्या
काव्याने माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. आरोपी रवी कुमार याने काव्याला 'राजकीय पाठबळ' असल्याचे सांगत शंभर लोकांसमोर बलात्कार करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा दावा तिने केला आहे. "एका आईसमोर तिच्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर हात उचलला जात असेल, तर मी शांत बसू शकत नाही," असे काव्याने रडत रडत सांगितले.

 काव्याची बहीण भव्या गौडा हिने राममूर्ती नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, आरोपींच्या बाजूनेही उलट तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांनी हा मालमत्तेचा वाद असल्याचे म्हटले आहे.

Web Title : अभिनेत्री के पति पर रिश्तेदारों का चाकू से हमला; बलात्कार, हत्या की धमकी

Web Summary : कन्नड़ अभिनेत्री काव्या गौड़ा के पति सोमशेखर पर पारिवारिक विवाद में रिश्तेदारों ने हमला किया, गंभीर रूप से घायल। काव्या का आरोप है कि बलात्कार और हत्या की धमकी दी गई। पुलिस जांच कर रही है, जबकि एक जवाबी शिकायत में संपत्ति विवाद को हिंसा का कारण बताया गया है। विवाद काव्या की बेटी की देखभाल को लेकर शुरू हुआ।

Web Title : Actress's Husband Stabbed by Relatives; Rape and Murder Threats

Web Summary : Kannada actress Kavya Gowda's husband, Somasekhar, was attacked by relatives over a family dispute, sustaining serious injuries. Kavya alleges rape and murder threats. Police are investigating, while a counter-complaint claims a property dispute fueled the violence. The argument started over the care of Kavya's daughter.