Aryan Khan Drug Case: आर्यनला भेटण्यासाठी ‘किंगखान’ पोहोचला आर्थर रोड तुरूंगात, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 10:16 IST2021-10-21T10:13:22+5:302021-10-21T10:16:08+5:30

Aryan Khan Drug Case, Shah Rukh Khan : जामीन नाकारला गेल्याने आर्यन अस्वस्थ झाला आणि यानंतर शाहरूख खान मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरूंगात पोहोचला.

Shah Rukh Khan today visited Mumbai's Arthur Road Jail to meet with his son Aryan Khan | Aryan Khan Drug Case: आर्यनला भेटण्यासाठी ‘किंगखान’ पोहोचला आर्थर रोड तुरूंगात, पाहा व्हिडीओ

Aryan Khan Drug Case: आर्यनला भेटण्यासाठी ‘किंगखान’ पोहोचला आर्थर रोड तुरूंगात, पाहा व्हिडीओ

ठळक मुद्दे3 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती.

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा ( Shah Rukh Khan ) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यासाठी काल 20 ऑक्टोबरचा दिवस महत्त्वाचा होता. त्याच्या जामीनावर निर्णय होणार होता. पण न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन नाकारला आणि आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला. जामीन नाकारला गेल्याने आर्यन अस्वस्थ झाला आणि यानंतर शाहरूख खान मुलाला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरूंगात (Arthur Road Jail) पोहोचला.
 नुकताच शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये शाहरुख जेलमध्ये जात असल्याचं दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी शाहरूख व गौरी खान यांनी आर्यनशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला होता. त्याआधी एनसीबीच्या कोठडीत असताना आर्यन व शाहरूख यांचा केवळ दोन मिनिटांचा फोनवरून संवाद झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शाहरूख आपल्या लेकाला प्रत्यक्ष भेटतोय.

3 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर 7 जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं आहे. सध्या आर्यन खानच्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. मात्र त्याला जामीन अजूनही मिळाला नाही. काळ झालेल्या सुनावणीमध्ये त्याचा जमीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. त्यांनतर आर्यन खानचा वकिलाने मुंबई हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे शाहरुख खान आणि त्याचं कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.
 एनसीबीच्या हाती लागलेल्या पुराव्यांनुसार आर्यन गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्सचा नियमित ग्राहक आहे.  जामीन मिळाल्यावर आर्यन खान पुराव्यांशी छेडछाड करू शकतो आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, असं,एनसीबीने न्यायालयात सांगितल होतं.

Web Title: Shah Rukh Khan today visited Mumbai's Arthur Road Jail to meet with his son Aryan Khan