"कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार…" पूजा सावंतचा संताप; कायदे कडक करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:23 IST2026-04-15T15:22:04+5:302026-04-15T15:23:24+5:30

पूजा सावंत आपल्या परखड मतांसाठी ओळखली जाते.

Pooja Sawant On Animal Cruelty Law And Women Safety Reform | "कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार…" पूजा सावंतचा संताप; कायदे कडक करण्याची मागणी

"कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार…" पूजा सावंतचा संताप; कायदे कडक करण्याची मागणी

'महाराष्ट्राची कलरफूल' अभिनेत्री म्हणून अभिनेत्री पूजा सावंतला ओखळलं जातं. पूजाने आजवर असंख्य मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये झळकून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. सध्या पूजा 'सालबर्डी' या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात पूजाने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या पूजा या चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पूजानं महिला सुरक्षा आणि प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य केलं. 

पूजा सावंतनं नुकतंच 'आरपार'ला मुलखत दिली. या मुलाखतीमध्ये पूजाला "समजा तू पोलीस ऑफिसर झाली असतीस, तर समाजातल्या कोणत्या गोष्टी तुला दुरुस्त कराव्याशा वाटल्या असत्या?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पूजाने अत्यंत गंभीर विषयांवर बोट ठेवलं. ती म्हणाली, "सर्वात आधी 'ॲनिमल क्रुएल्टी'  म्हणजे प्राण्यांवरील क्रौर्याबाबतचे कायदे बदलायचे आहेत. आपल्याकडे प्राण्यांना इजा पोहचवणाऱ्यांविरुद्ध कोणताही कडक कायदा नाही. जर तुम्ही एखाद्या प्राण्याला दुखापत केली आणि तुमच्यावर केस झाली, तर तुम्ही केवळ ५० रुपये दंड भरून पोलीस स्टेशनमधून आरामात बाहेर येऊ शकता. इतका तो सोपा आणि कमकुवत कायदा आहे. जर मी पोलीस ऑफिसर असते, तर हा कायदा नक्कीच बदलला असता".

दुसरा महत्त्वाचा मुद्दा मांडताना पूजाने महिलांच्या सुरक्षेवर भाष्य केले. ती म्हणाली, "दुर्दैवाने आजही भारतात स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत, ते पाहून खूप वेदना होतात. यासाठी मला कायदे अधिक कडक करायला आवडतील. जर गुन्हेगाराला माहित असेल की शिक्षा तात्काळ आणि अत्यंत भयानक मिळणार आहे, तर तो कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार करेल".

पूजाच्या मते, गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हेगाराच्या मनात कायद्याचा धाक असणे सर्वात महत्त्वाचे आहे. ती पुढे म्हणाली, "भीती जर गुन्हेगाराच्या मनात असेल, तर अशा गुन्ह्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. म्हणून शिक्षेची तरतूद करण्यावर मी प्रामुख्याने काम केलं असतं".

Web Title : किसी भी महिला को छूने से पहले दस बार सोचो: पूजा सावंत

Web Summary : अभिनेत्री पूजा सावंत ने सख्त कानूनों की वकालत करते हुए महिलाओं की सुरक्षा और पशु क्रूरता पर चिंता व्यक्त की। उन्होंने अपराधियों को रोकने और कमजोर व्यक्तियों की रक्षा के लिए कठोर दंड की आवश्यकता पर जोर दिया।

Web Title : Think Ten Times Before Touching a Woman: Pooja Sawant

Web Summary : Actress Pooja Sawant, advocating for stricter laws, expressed concern over women's safety and animal cruelty. She emphasized the need for harsher penalties to deter criminals and protect vulnerable individuals.